Laxman Hake Sarkarnama
पुणे

Laxman Hake : 'जरांगेंनी जिथे पाडायला सांगितलं, तिथं विक्रमी मताने विजय'; लक्ष्मण हाकेंचा दावा

Laxman Hake Pune OBC reservation Panchayat Raj Manoj Jarange assembly elections : पुणे इथं पत्रकार परिषद घेत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांचा फॅक्टर फेल गेल्याचा दावा केला.

Sudesh Mitkar

Pune News : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत 204 मराठा उमेदवार निवडून आल्याचे सांगत, या निवडणुकीत मराठा फॅक्टर चालल्याचं त्यांनी सांगितलं.

तसेच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी उभं केलेल्या उमेदवारांना जास्त मतं पडली नसल्याचा दावा देखील जरांगेंनी केला होता. त्यावर लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेत जरांगेंच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, "निवडणुकीपूर्वी आम्ही ओबीसी (OBC) मतदारांना ज्या ज्या ठिकाणी आम्ही ओबीसीचे उमेदवार दिले नाहीत. त्या ठिकाणी महायुतीला मतदान करा, असं आवाहन केलं होतं . त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत ओबीसी, एससी, एसटी , व्हीजेएनटी आणि इतर समाजाने उत्स्फूर्तपणे मतदान केलं. त्यांचे मी आभार मानतो कारण जो आरक्षणाचा लढा आहे. त्याचा एक टप्पा यामुळे पूर्ण झाला आहे". मात्र खरी लढाई यानंतर सुरू होणार असून आता महाराष्ट्राचा जो कोणी मुख्यमंत्री होईल, त्याला पंचायतराजमध्ये ओबीसींचा आरक्षण सस्टेन करण्यासाठी दबाव आणण्याचं काम आम्ही करणार आहोत, असा देखील इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी मराठा (Maratha) आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ते 130 जागांवर बिमोड आणि नायनाट करण्याची भूमिका घेतली होती. छगन भुजबळ यांना पडण्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होत. त्यांनी छगन भुजबळ यांना पाडण्यासाठी येवल्यामध्ये जाऊन 40 बैठका देखील घेतल्या. धनंजय मुंडेंना आणि कळमनुरी, गंगाखेड जत अशा अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवार पाडण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र ज्या ज्या ठिकाणी जरांगे यांनी उमेदवार पाडण्याची भूमिका घेतली होती त्या ठिकाणचे उमेदवार विक्रमी मतांनी निवडून आले आहेत, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला.

आम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे आठ ते नऊ उमेदवार दिले होते. त्यांच्यासाठी मी सभा घेतल्या होत्या, त्यांना भरभरून मत मिळाली. मनोज जरांगे पाटील यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे मी ज्या ठिकाणी सभा घेतल्या तिथे अत्यंत कमी मतं पडल्याचा आरोप केला होता. मात्र मी त्या सर्व उमेदवारांची यादी घेऊन आलो असून सर्व ठिकाणी भरघोस मत या उमेदवारांना पडली आहे, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला.

राजेश टोपेंची सत्ता घालवली

घनसांगवी मतदार संघात आम्ही राजेश टोपे यांना पाडण्याची भूमिका घेतली होती. त्या ठिकाणी कावेरी खटके या महिला उमेदवार उभ्या केल्या होत्या. त्यांना 21 हजार मतं मिळाली असून राजेश टोपे यांची 25 वर्षाची सत्ता 2500 मतांनी आम्ही घालवल्याचा दावा लक्ष्मण हाके यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT