Ajit Pawar News : बारामतीच्या 'दादां'वर कोथरूडचे 'दादा' वरचढ; जिल्ह्यात सर्वाधिक लीड कोथरूड मधूनच...

Votes Baramati Kothrud NCP Ajit Pawar BJP Chandrakant Patil Pune : पुण्यात सर्वाधिक अधिक मताधिक्य कोणाला, याची चर्चा रंगली असून, जिल्ह्यातील चार जणांना लाखांचे मताधिक्य आहे.
Ajit Pawar Chandrakant Patil
Ajit Pawar Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक लीड घेऊन विजयी होण्याचं रेकॉर्ड आत्तापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राखल्याचं अनेकदा पाहिला मिळाले. यंदा देखील अजित पवार यांनी एक लाखावर अधिकच लीड बारामती विधानसभा मतदार संघातून घेतलं.

असं असलं तरी पुणे जिल्ह्यामधून सर्वाधिक लीड घेऊन कोथरूड विधानसभा मतदार संघातून भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील विजयी झालेत. त्यामुळे बारामतीच्या 'दादां'वर लीडच्या दृष्टिकोनातून कोथरूडचे 'दादा' भारी ठरल्याचं बोलले जात आहे.

बारामती (Baramati) विधानसभा मतदारसंघातून अजित पवार सातत्याने मोठ्या मताधिक्याने विजयी होत आले आहेत. सर्वप्रथम 2009 च्या निवडणुकांमध्ये अजित पवार यांनी एक लाखाहून अधिकचं लीड घेतलं होतं. त्यावेळी त्यांना 1 लाख 28 हजार 544 मत पडली होती. त्यांच्या विरोधात असलेले अपक्ष उमेदवार राजन तावरे यांना 25 हजार 747 मते पडली होती. अजित पवारांचे विजयाचे मार्जिन हे 1 लाख 2 हजार 797 इतकं होतं.

Ajit Pawar Chandrakant Patil
Sangram Thopate Defeat : अजितदादांनी अखेरच्या क्षणी टाकलेला डाव थोपटेंना पडला भारी; 45 वर्षांची सत्ता संपुष्टात

2019 च्या निवडणुकांचा विचार केला, तर त्यावेळी भाजपने (BJP) अजित पवारांसमोर गोपीचंद पडळकर यांचे आव्हान उभं केलं होतं. या निवडणुकीत अजित पवार यांना एक लाख 95 हजार मत मिळाली, तर समोर असलेल्या गोपीचंद पडळकर तीस हजार मते घेऊ शकले. त्यामुळे अजित पवारांचा 1 लाख 65 हजार मताच्या लीडने विजय मिळाला.

Ajit Pawar Chandrakant Patil
Sunil Kamble Won : जमेची बाजू असताना देखील, काँग्रेसने कॅन्टोन्मेंट गमावला

यंदाच्या निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदार संघातून अजित पवार यांच्या विरोधात कुटुंबातूनच उमेदवार देण्यात आला होता. अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात टाकले होते. योगेंद्र पवार निवडणूक रिंगणात असले तरीही निवडणूक अजित पवारविरुद्ध शरद पवार, अशीच झाल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळे ही निवडणूक अजित पवारांसाठी कठीण बनली होती. तरी देखील या निवडणुकीत अजित पवार यांना 1 लाख 899 मताचं लीड मिळालं आहे. यामुळे ते जिल्ह्यातून लीडच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर राहिले.

चंद्रकांत पाटील पहिल्या क्रमांकावर

कोथरूड विधानसभा मतदार संघातून चंद्रकांत पाटील यांना यंदा 1 लाख 12 हजार 41 मतांचं लीड मिळालं. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील शेळके मावळमधून 1 लाख 8 लाख 556 मतांचे लीड घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर भाजपचे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शंकर जगताप यांनी 1 लाख 3 हजार 865 मतांचे लीड घेतल्याचा पाहिला मिळालं. पुणे जिल्ह्यातून एक लाखाहून अधिक लीड घेणाऱ्यांमध्ये दोन भाजपचे, तर दोन अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याचं समोर आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com