Pune News : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत प्रलंबित मागण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यांच्या या आंदोलनावर प्रतिक्रिया देण्यासाठी ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली.
पत्रकार परिषदेनंतर विविध माध्यमांशी त्यांनी वन टू वन संवाद देखील साधला. यावेळी एका माध्यमाशी संवाद साधताना हाके यांनी मनोज जरांगे यांचा 'मनोजदादा,' असा उल्लेख करत एक सल्ला दिला.
लक्ष्मण हाके म्हणाले, "माझ्याकडून अंतरवलीच्या बाबाला उपोषणाला हार्दिक शुभेच्छा, मात्र आत्तापर्यंत आठ उपोषण झाले आता हे नववे उपोषण आहे.जरांगे यांनी ५ पिढ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप केला आहे. मग फायदा नेमका कुणाचा झाला? मराठा समाजाला गरिबी का आली, याचे उत्तर त्यांनी आधी द्यावे. मराठा पुढाऱ्यांनीच संपत्तीचे केंद्रीकरण केले आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या गरिबीला ओबीसी आरक्षण कसं काय जबाबदार असू शकतं? बजेटमध्ये ओबीसींसाठी किती पैसे येतात, हे सरकारने सांगावे असे हाके म्हणाले.
सरकारने मनोज जरांगे यांचे सातत्याने लाड पुरवले असून त्यांच्यासाठी 'रेड कार्पेट' अंथरले. सरकारच्या या भूमिकेमुळे राज्यातील ओबीसी समाज संपण्याच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी जरांगे यांच्या सर्व मागण्या का मान्य केल्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मनोज जरांगे पाटील हे जर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा मराठवाड्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येवर आंदोलन करणार असतील, तर मी स्वतः त्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होईन. परंतु, ओबीसी आरक्षणाला धक्का लावून मराठ्यांना त्यात समाविष्ट करण्याच्या चुकीच्या मागणीविरोधात आमची लढाई अशीच सुरू राहील, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला.
मनोज दादा, सरकारकडे ज्या मागण्या करत आहेत. ती मागणी म्हणजे हाल्याला दूध काढण्याचा प्रकार आहे. मात्र हाल्या दूध देणार नाही तर हाल्याकडून शिंग घुसेल हे मनोजदादांन समजून घ्यावं अस हाके म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.