Pune, 31 August : राज्यात महायुतीचे सरकार असून महायुतीमधील सर्वच घटक पक्षांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. महायुतीचा धर्म सर्वांनी पाळला पाहिजे. आंबेगावमधील राजकीय दुरावा स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेऊन दूर करावा, त्यासाठी स्थानिक नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून पुढे आले, तर आम्हीही पुढे येऊ. एकतर्फी प्रेम करून चालत नाही, असा टोला विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी लगावला.
विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर हे आज श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथील उद्योजक रमेश येवले यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयात सोमवारी ता. ३१ ऑगस्ट) पत्रकार परिषद झाली. त्यात अहिर यांनी निशाणा साधला.
अहिर म्हणाले, पुणे जिल्हा परिषदेत आमच्या सदस्यांना विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. विकास कामांसाठी सर्व सदस्यांना सरसकट निधी मिळालाच पाहिजे.
पिंपरी-चिंचवड, पुणे शहर तसेच जिल्ह्यात शिवसेना पक्षवाढीसाठी आपण (सचिन अहीर), उद्योगमंत्री उदय सामंत, माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि आमदार शरद सोनवणे अधिक लक्ष देणार आहोत, असेही सचिन अहीर यांनी स्पष्ट केले.
कुंभमेळ्यापूर्वी भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने विकासकामांचा आढावा घेण्यासाठी नोव्हेंबरमध्ये बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी शिवसेना नेते रमेश येवले, मंचरच्या नगराध्यक्षा राजश्री दत्ता गांजाळे, उद्योजक नित्यानंद येवले व शिवसैनिक उपस्थित होते.
स्थानिक नेत्यांनी पुढाकार घ्यावा : सचिन अहिर
आंबेगाव तालुक्यातील महायुतीतील राजकीय दुरावा स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेऊन दूर करावा, त्यासाठी स्थानिक नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून पुढे आले, तर आम्हीही पुढे येऊ. एकतर्फी प्रेम करून चालत नाही, असा टोला विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.