Satara Dcc Bank : शिवेंद्रराजे अन्‌ उदयनराजेंच्या ताकदीमुळे मातब्बरांची डोकेदुखी वाढणार : नव्या चेहऱ्यांना पुन्हा करावी लागणार प्रतीक्षा...

Shivendra Raje and Udayanraje Bhosale News : सातारा डीसीसी बँकेच्या निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सर्वाधिक मतदारसंख्या आहे. त्यांच्यानंतर मकरंद पाटील, नितीन पाटील, उदयसिंह पाटील-उंडाळकर आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांचे मतदार आहेत.
Udayanraje Bhosale-Shivendra Raje- makrand patil-Ramraje Naik Nimbalkar-nitin patil
Udayanraje Bhosale-Shivendra Raje- makrand patil-Ramraje Naik Nimbalkar-nitin patilSarkarnama
Published on
Updated on

Satara, 31 August : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सर्वाधिक मतदार आहेत. त्यापाठोपाठ मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आणि रामराजे नाईक- निंबाळकर यांंच्याकडेही मतदार संख्या आहेत.

आता खासदार उदयनराजे भोसले यांना मानणारे २५० ठराव झाले असल्याने जागा वाटपात त्यांचाही प्रभाव वाढेल. दुसरीकडे, दहा वर्षे संचालकपदाच्या नव्या नियमाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत तरी राज्यात झालेली नसल्यामुळे विद्यमान संचालकांना पुन्हा संचालकपदाची संधी आहे. त्यामुळे यावेळी बॅंकेत नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का, याची उत्सुकता आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, २७ ऑगस्टपर्यंत हरकती नोंदवल्या आहेत. दाखल हरकतींवरील सुनावणीनंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

या निवडणुकीत मंत्री शिवेंद्रराजेंनंतर खासदार उदयनराजे भोसले यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. उदयनराजेंकडे गृहनिर्माण संस्थांचे २०० आणि इतर मतदारसंघांतील ५० असे एकूण २५० मतांचे संख्याबळ असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आपल्या हक्काच्या गृहनिर्माण व दुग्ध संस्था मतदारसंघांसोबतच ते आणखी दोन अतिरिक्त जागांसाठी आग्रही असणार आहेत.

Udayanraje Bhosale-Shivendra Raje- makrand patil-Ramraje Naik Nimbalkar-nitin patil
Shahajibapu-Deepak Salunkhe Yuti : शहाजीबापू-दीपकआबांची पुन्हा युती?; सांगोल्यातील ‘कानगोष्टीं’ची जिल्ह्यात चर्चा!

परिणामी, बँकेत वर्चस्व असणारे मंत्री शिवेंद्रसिंहराजे, खासदार नितीन पाटील, मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील आणि माजी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांना खासदार उदयनराजेंना विचारात घेऊनच जागावाटप करावे लागेल.

Udayanraje Bhosale-Shivendra Raje- makrand patil-Ramraje Naik Nimbalkar-nitin patil
Madha Politic's : आमदार अभिजीत पाटलांना भेटून आलेल्या सहकार मंत्र्यांचा रणजितसिंह शिंदेंना 2029 ची तयारी करण्याचा सल्ला...

दुसरीकडे, सलग १० वर्षे संचालक राहिलेल्यांना पुन्हा संधी न देण्याच्या नव्या नियमाची राज्याने अद्यापपर्यंत तरी अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे जुने मातब्बर संचालकच पुन्हा बॅंकेत दिसण्याची शक्यता आहे. जुने संचालक पुन्हा बॅंकेत येण्याच्या शक्यतेमुळे नवीन चेहऱ्यांना राखीव जागांवरून नशीब अजमावण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी जिल्हा बँकेत जुन्या संचालकांसह राखीव जागांवर नवीन चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com