पुणे

Leopard in Pune : पुण्यात बिबट्याची नुसती बातमी अन् पोलिसांची उडाली भंबेरी! गणेशखिंड रोडवर काय घडलं?

Leopard Scare in Pune : ‘इथे बिबट्या आहे’ या फोननंतर गणेशखिंड रोडवर खळबळ उडाली. पोलिसांची धावपळ झाली; पण तपासात गणेशखिंड रोडवर काय घडलं?

Sudesh Mitkar

Pune News : पुण्यातील औंधमध्ये काल पहाटे सीसीटीव्हीत बिबट्या दिसल्यामुळे शहरात दहशत पसरली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळी गणेशखिंड रोडवरील पुणे विद्यापीठाजवळील पॉलिटेक्निक कॉलेज परिसरात पुन्हा बिबट्याच्या हालचालीची बातमी पसरली आणि काही काळ परिसरात घबराट निर्माण झाली.

सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या काही महिलांना रस्त्या लगतच्या झुडपांमध्ये असामान्य हालचाल दिसली. औंधची घटना ताजी असल्याने त्यांनी घाबरतच तात्काळ पोलिसांना फोन केला. बातमी मिळताच औंध पोलिस आणि वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसराची बारकाईने तपासणी केल्यानंतर मात्र समोर आलेलं चित्र वेगळंच होतं.

तिथे बिबट्या नव्हता, फक्त एक मोठा वानर (माकड) बसलेला होता! यामुळे काही मिनिटांतच निर्माण झालेली दहशत संपली आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. पुणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत बिबट्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मुळशी, ताम्हिणी घाट, आंबेगाव, जुन्नर, पिंपरी-चिंचवड परिसरातील टेकड्या अशा भागांत बिबट्यांचा वावर वारंवार निदर्शनास येतो. या भागांत बिबट्याच्या हल्ल्यांत काही जि‍वितानीही झाली आहे. त्यामुळे शहरालगतच्या भागांत बिबट्या दिसला की लगेच खळबळ उडणे स्वाभाविक झालं आहे.

औंधमधील सीसीटीव्ही फुटेजनंतर नागरिकांची सतर्कता वाढली आहे हे आजच्या या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आलं. मॉर्निंग वॉकला जाणारे, रात्री उशिरा घरी परतणारे विद्यार्थी, पाळीव प्राणी फिरायला घेऊन जाणारे असे सर्वच स्तरांत सावधगिरी वाढली आहे. आजची ही धावपळ शेवटी निरुपद्रवी ठरली तरी पुण्यात बिबट्याचा मुद्दा आणि त्याबद्दलची जनसामान्यांची भीती कायम आहे.

वनविभाग व पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की, अनावश्यक घाबरू नका; पण झुडपात किंवा रस्त्यालगत संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित १०० किंवा वनविभागाच्या हेल्पलाइनवर कळवा. सतर्कता बाळगा, पण अफवांवर विश्वास ठेवू नका.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT