Siya Goyal boyfriend Chetan family statement: लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवाल याला दरीत ढकलून हत्या केल्याच्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना अटक केली आहे. मात्र, आता आरोपी चेतन चौधरीच्या कुटुंबियांनी या प्रकरणात आपल्या मुलाचा काहीही संबंध नसून त्याला बळजबरीने अडकवलं जात असल्याचा दावा केला आहे.
चेतन चौधरीचे बाबूलाल चौधरी यांनी "चेतनचा या हत्येशी काहीही संबंध नाही, त्याला या प्रकरणात बळजबरीने गोवण्यात आल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, "आमच्या कुटुंबाचा सिया गोयल नावाच्या मुलीशी दूरपर्यंत काहीही संबंध नव्हता. सिया आणि चेतन यांच्यात मैत्री होती किंवा ते एकमेकांसोबत फिरतात हे आम्हाला पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर समजलं. आमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने आजपर्यंत त्यांना एकत्र पाहिलेले नाही.
१८ जून रोजी चेतन लोहगड किल्ल्यावर गेलाय याची आम्हाला कल्पनाही नव्हती. घरातून जाताना त्याने एका मीटिंगला निघालो आहे, असं सांगितलं होतं. शिवाय पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर चेतन मला म्हणाला की, माझा या घटनेशी काहीही संबंध नाही. मी तिथे हजर होतो, हे मला बळजबरीने कबूल करायला लावले आहे. तो तिथे प्रत्यक्षात हजर होता की नव्हता, हे आम्हाला माहिती नाही.
तिथे गेल्याचे पुरावे पोलीस दाखवतायत पण त्याने आम्हाला काहीही सांगितले नव्हते. चेतनवर यापूर्वी कोणताही आरोप किंवा पोलीस केस नाही," असं त्याच्या वडिलांनी सांगितलं. तर या घटनेच्या वेळी चेतन मुख्य स्पॉटपासून काही अंतरावर उभा होता आणि केतन दरीत कोसळला तेव्हा सिया त्याच्या अगदी जवळ उभी होती, असं आपणाला चेतनने सांगितल्याचं दावाही त्याच्या वडिलांनी केला आहे.
तर चेतनचे काका म्हणाले, चेतनचा या संपूर्ण प्रकरणात कोणताही रोल नाही. तो अतिशय सज्जन आणि सरळ स्वभावाचा मुलगा आहे. त्यामुळे आता या प्रकरणात कुटुंबियांच्या दाव्यामुळे अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत.
दरम्यान, एकीकडे पोलिसांनी सीसीटीव्ही आणि कॉल डिटेल्सच्या आधारे सिया आणि चेतन यांनी कॅफेत बसून हत्येचा कट रचल्याचा दावा केलाय. तर दुसरीकडे चेतनच्या कुटुंबीयांनी तो निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता खरंच सिया आणि चेतनने मिळून केतनला मारलं की चेतनला सिया अडकवत आहे? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.