Sharad Pawar, Muralidhar Mohol Sarkarnama
पुणे

Pune Lok Sabha News 2024 : मोठी बातमी! पुण्यातून शरद पवार लढणार, कार्यकर्त्यांचा हट्ट पुरवणार का?

Sharad Pawar Vs Muralidhar Mohol : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी सुरू आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pune Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी सुरू आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने लढावावी, अशी मागणी पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. शिवाय या जागेवर खुद्द शरद पवारांनी (Sharad Pawar) उमेदवारी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे जर पवारांनी कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार केला तर पुणे मतदारसंघासह राज्यातील राजकारणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

राज्यात महाविकास आघाडीकडून (MVA) कोणत्या ठिकाणी कोणता उमेदवार देण्यात येणार, याबाबतचं गणित ठरलेलं नाही. अशातच पुण्यातील महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपचे मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांची उमेदवारी फिक्स झाली आहे. काँग्रेसने पुण्याच्या जागेवर दावा केला असला तरी अद्याप त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकीकडे पुण्यातील पैलवानापुढे कोणता उमेदवार टिकू शकत नाही, असं म्हणत या जागेवर आपला एकतर्फी विजय होईल असा महायुतीला विश्वास आहे. मात्र, पुण्यातील जागा राष्ट्रवादीने लढावी ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अशातच जर पवारांनी (Sharad Pawar) कार्यकर्त्यांचा आग्रह मनावर घेतला आणि पुण्यातून त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली तर पुण्यात काहीही घडू शकतं. शिवाय पुण्यातून मुरलीधर मोहोळ विरुद्ध शरद पवार (Murlidhar Mohol vs Sharad Pawar) अशी लढत झाल्यास राज्यासह देशाचं लक्ष या मतदारसंघाकडे लागेल यात शंका नाही. पण शरद पवार खरंच कार्यकर्त्यांचा हट्ट पुरवणार का आणि पुण्यातून निवडणूक लढवणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एकीकडे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरुन मतभेद असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) साथ मविआला मिळणार की नाही? हे देखील स्पष्ट झालेलं नाही. तर दुसरीकडे महायुतीमध्ये शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यासह मनसेलाही योग्य त्या जागा देऊन समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे सध्या महायुतीचे पारडे जड असल्याचं बोललं जात आहे.

पण तरीही महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शरद पवारांकडून अनेक अपेक्षा आहेत. पवार कधी कोणता डाव टाकतील आणि बाजी पलटवतील हे सांगता येत नाही. याचं उदाहरण म्हणजे साताऱ्यातील पोटनिवडणूक, पवारांनी एका सभेत सर्व वातावरण पालटवून टाकलं होतं. याचीच पुनरावृत्ती पुण्यात होणार की काय? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्याचं कारण म्हणजे पुण्यातून आता खुद्द शरद पवारांनी निवडणूक लढवावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) जर पुण्यातून आपली उमेदवारी जाहीर केली तर तो महायुतीसाठी मोठा धक्का ठरु शकतो. शिवाय ही राज्यासह देशातील राजकारणातील एक मोठी घडामोड ठरु शकते.

(Edited By - Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT