Sharad Pawar - Pankaja Munde Meeting: पवारांची भेट अन् पंकजा मुंडे आपल्याच सरकारविरोधात झाल्या आक्रमक; म्हणाल्या...

Maharashtra Politics : ...तर आम्ही आंदोलन करणार!
Pankaja Munde - Sharad Pawar Meeting
Pankaja Munde - Sharad Pawar MeetingSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी पक्षातील भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेकडून (शिंदे गट) आव्हाडांविरोधात आक्रमक झाली आहे. पण याचवेळी पुण्यातून मोठी माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपच्या फायरब्रँड नेत्या पंकजा मुंडे यांची पुण्यात गुरुवारी भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली.या बैठकीत ऊसतोड कामगारांच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाली. या चर्चेनंतर ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवरुन आपल्या सरकारला गर्भित इशारा दिला आहे.

Pankaja Munde - Sharad Pawar Meeting
Jitendra Awhad : महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडूनच आव्हाडांविरोधात पोलिसांत धाव

शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.या पत्रकार परिषदेत त्यांनी ऊसतोड कामगार आणि गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातील कारभारावरुन सरकारवर टीका केली. तसेच मुंडे यांनी आपल्याच सरकारला अंतिम इशारा देताना आम्हांला आंदोलन करावे लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नये.तशी परिस्थिती निर्माण झाली तर आंदोलन देखील करु असं मुंडे म्हणाल्या होत्या.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या...?

शरद पवार यांनी आपल्या व्यस्त शेड्यूलमधून माझ्यासाठी वेळ दिला.त्यासाठी मी त्यांना आभार मानते.पण गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) महामंडळाची फक्त स्थापना झाली.मात्र, पुढे काहीच काम झाले नाही.यावर पवारांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.मी सुध्दा नाराज असल्याचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच साखर संघाने 34 टक्के दरवाढ देण्याचे मान्य केले आहे.मुकादमांना एक टक्का दरवाढ देणार आहे. शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचा लवाद ऊसतोड कामगारांबाबत वर्षानुवर्षे निर्णय घ्यायचा. ती पंरपरा कायम आहे असेही मुंडे म्हणाल्या.

(Edited By Deepak Kulkarni)

Pankaja Munde - Sharad Pawar Meeting
Milk Production : राजकर्त्यांच्या नाकर्तेपणाचे पाप! दूध उत्पादनात महाराष्ट्र सहाव्या स्थानावर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com