Lok Sabha Election 2024  Sarkarnama
पुणे

Lok Sabha Election 2024 : अजितदादांच्या बैठकीत ठरलं! भुजबळांनी सांगितला नाशिकवर दावा; शिवसेनेच्या नाराजीचं काय?

Chhgan Bhujbal On Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देण्याच्या हालचाली महायुतीत सुरू आहेत.

Sudesh Mitkar

Pune News : महायुतीच्या लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपामध्ये नाशिक मतदारसंघावरून नवा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. नाशिक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देण्याच्या हालचाली महायुतीत सुरू आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. यावर छगन भुजबळांनी स्वतः भूमिका स्पष्ट केली आहे. (Latest Marthi News)

आज पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाविषयीची बैठक पार पडली, यानंतर छगन भुजबळ यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले, 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बैठक घेऊन नाशिक लोकसभेची जागा लढवायची का नाही? याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवावी, अशी भूमिका मांडली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारतीय जनता पक्षाने नाशिक मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी भाजपच्या कमळ या चिन्हावर उमेदवारी करावी, असा प्रस्ताव दिला असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, 'भाजपच्या चिन्हावरती नाशिक लोकसभा निवडणूक लढवली जाणार नाही. जो कोणी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिला. तो राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरतीच निवडणूक लढवले, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

नाशिक लोकसभा लढवण्यासाठी छगन भुजबळ इच्छुक आहेत का ? असे विचारले असता छगन भुजबळ म्हणले, 'माझ्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, ही जागा सर्वप्रथम आम्हाला मिळते की नाही? हे ठरणार आहे. त्यानंतर उमेदवार कोण असेल यावरती निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ही जागा मिळाली तर निवडणूक लढणार का? या जर तरच्या प्रश्नांवरती मी उत्तर देणार नाही, असंदेखील भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्पष्ट केले.

लोकसभेची (Lok Sabha) निवडणूक लढवून राष्ट्रीय नेते म्हणून तुम्ही केंद्रात जायला तयार आहात का? असा प्रश्न विचारला असता छगन भुजबळ यांनी यावर मार्मिक टिप्पणी केली. "मी या देशात राहायला इच्छुक आहे," असं ते म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT