Pimpri-Chinchwad Police News : नाकाबंदीत पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर पोलिसांच्या हाती लागली 50 लाखांची रोकड!

Pune-Mumbai Expressway Police Checking : निवडणुकीसाठीच ही रक्कम नेण्यात येत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
Gold theft of Rs 3 crore: Kerala police take action in Satara
Gold theft of Rs 3 crore: Kerala police take action in Satara
Published on
Updated on

Urse Toll Plaza News : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने पैशाची मोठी उलाढाल सुरू झाली आहे. त्याला मंगळवारी लगेचच दुजोरा मिळाला. कारण पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील उर्से टोल नाक्यावर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पन्नास लाख रुपयांची बेहिशोबी रोकड पकडली. या निवडणुकीच्या अगोदर राज्यात हाती आलेले हे पहिलेच मोठे घबाड आहे.

निवडणुकीसाठीच ही रक्कम नेण्यात येत असल्याचा पोलिसांना संशय आहे. एका कारमध्ये ती नाकाबंदीदरम्यान त्यांना आढळून आली. त्याबाबत कारमधील तिघांना समाधानकारक खुलासा करता न आल्याने त्या कारसह स्थानिक शिरगाव पोलिसांनी जप्त केली. अशा प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे त्यात कारवाईचा वा ती सापडलेल्यांना अटक करता येत नाही. आयकर विभागाकडे ही रोकड देण्यात येणार असून, पुढील तपास तेच करतील, असे स्थानिक डीसीपी बापू बांगर यांनी "सरकारनामा"ला सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Gold theft of Rs 3 crore: Kerala police take action in Satara
Loksabha Election 2024 : महायुतीत बारामती राष्ट्रवादी, तर मावळ शिवसेनेलाच सुटणार, कुणी दिले स्पष्ट संकेत?

रोकड सापडलेले ठिकाण हे मावळ लोकसभा मतदारसंघात येते. तेथे युतीकडून (शिंदे शिवसेना) श्रीरंग बाऱणे, तर संजोग वाघेरे-पाटील यांची आघाडीकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) उमेदवारी जवळपास नक्की झाली आहे. गुरुवारी त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी नऊ ठिकाणी नाकाबंदी मंगळवारी लावली होती.

उर्से टोल नाक्यावर स्थानिक शिरगाव पोलिस ठाण्याचे पीएसआय नईद शेख आणि पथक त्याकरिता तैनात होते. त्यांनी मुंबईकडून पुण्याकडे येणाऱी संशयास्पद स्कॉर्पिओ कार अडवली. त्यात तिघेजण होते. त्यांच्याकडे पन्नास लाखांची रोकड सापडली. त्याबद्दल योग्य तो खुलासा त्यांना करता न आल्याने पोलिसांनी ही रक्कम जप्त केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Gold theft of Rs 3 crore: Kerala police take action in Satara
Ajit Pawar Vs Amol Kolhe : 'नथूराम गोडसेचीही भूमिका केली होती, हेही सांगा', अमोल कोल्हेंना अजित पवारांचं आव्हान!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com