ajit pawar | dattatray Bharne sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : भरणेंची शरद पवार गटातील कार्यकर्त्याला शिवीगाळ; अजितदादा म्हणाले, तिथे...

Dattatray bharane News : बारामतीत हायव्होल्टेज निवडणूक रंगली असताना दत्तात्रय भरणे यांनी एका कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं राजकारण तापलं आहे.

Akshay Sabale

Pune News, 7 May : बारामती लोकसभा मतदारसंघात ( Baramati Lok Sabha Constituency ) पवार विरुद्ध पवार, असा संघर्ष तापलेला आहे. यातच इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे ( Dattarray Bharne ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील ( शरदचंद्र पवार ) एका कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी शेअर केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापुरात जाऊन कार्यकर्त्याची भेट घेतली. याप्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

नेमकं काय घडलं?

आमदार भरणे यांनी शरद पवार गटातील नाना गवळी या कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी 'एक्स' अकाउंटवर ट्वीट केला होता. हा प्रकार समजताच सुळेंनी ( Supriya Sule ) इंदापूर गाठलं. त्यांनी नाना गवळींची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधत घडलेला प्रकार जाणून घेतला. 'बूथवरून काही वाद झाला नाही. भरणे त्यांच्या कारमधून उतरले. आपल्या बूथवर त्यावेळी गर्दी झाली होती. त्यामुळे मी जरा बाजूला गेला होता. भरणे तिथे आले आणि त्यांनी थेट शिवीगाळच सुरू केली,' असा घटनाक्रम गवळींनी सांगितला.

तुम्ही स्वत: काही बोलला नाही ना? असा सवाल सुळेंनी विचारला. त्यावर गवळींनी म्हटलं, 'आम्ही त्यांना काही बोललोच नव्हतो. त्यांनी कारमधून उतरल्यानंतर मला शिवी देण्यास सुरवात केली. तुला गावात राहायचं आहे की नाही? तुझी काय औकात आहे? असं म्हणत त्यांनी शिव्या दिल्या. तरीही मी त्यांना काहीही बोललो नाही.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार काय म्हणाले?

याप्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी भाष्य केलं आहे. "तिथे वाद होऊ नये म्हणून दत्तात्रय भरणेंनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, वकिलांच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचं दत्तात्रय भरणेंनी सांगितलं आहे," असं अजित पवारांनी म्हटलं.

"मी शिवीगाळ केली नाही"

व्हायरल व्हिडीओबद्दल दत्तात्रय भरणे म्हणाले, "मी माझ्या मराठी भाषेत बोललो. पण, मी शिवीगाळ अजिबात केली नाही. मतदान असल्यानं मतदान केंद्राजवळ फिरत होतो. तिथे कार्यकर्त्यांचं भांडण दिसल्यानं मी तिथे गेलो. त्यावेळी बारामती अ‍ॅग्रोचा कर्मचारी वेगळ्या भाषेत बोलत होता. त्यानं माझ्या विरोधातही शब्द वापरले. गावकरी त्याच्यावर धावून आले. जर, मी तिथे नसतो, तर अनर्थ घडला असता. पैशाचे वाटप तो करत होता. माझ्या मराठी भाषेत मी बोललो. कोणताही राजकीय हेतू नव्हता," असं स्पष्टीकरण दत्तात्रय भरणेंनी दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT