ajit pawar sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : अजित पवारांनी इंदापुरात केलेल्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल; कारवाई होणार?

Akshay Sabale

Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) आणि खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांच्यात अटीतटीचा सामना सुरू आहे. सुनेत्रा पवार यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रचाराचा धुरळा सुरू आहे. यातच इंदापुरात अजित पवारांनी ( Ajit Pawar ) केलेल्या एका वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे आयोग काय कारवाई करते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

"आपल्या भागाला निधी देण्यात मी कमी पडणार नाही. मात्र, तुम्हीही मतदान करायला गेल्यावर मशिनमध्ये आमच्या उमेदवारच्या समोरचं बटन कचा-कचा दाबा. म्हणजे मलाही निधी द्यायला बरे वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल," असं विधान अजित पवारांनी ( Ajit Pawar ) केलं होतं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवारांच्या या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे ( Election Commission ) तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगानं चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, तर "चौकशी करण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार आहे," असं अजित पवारांनी म्हटलं.

अजित पवार म्हणाले, "मी इंदापूरमध्ये केलेलं वक्तव्य ग्रामीण बोललो होतो. तेच पुण्यात असतो, तर तिथं कचा-कचा बोलेलं नाही चालतं. ज्या भाषेत चालतं तसेच, बोलावं लागतं. चौकशी करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे."

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT