Maharashtra Political News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून एकमेकांविरोधात लढत आहेत. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये एकही थेट लढत होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. अर्थात, या लोकसभा निवडणुकीत पंजा Vs घडयाळ आमना-सामना नाहीच ! There is no fight between NCP Ajit Pawar and Congress in Maharashtra.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा ?
शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली आणि मूळ पक्ष व चिन्हासह अजित पवारांची Ajit Pawar राष्ट्रवादी महायुतीचा घटक बनली. महायुतीच्या जागावाटपात सर्वाधिक जागा भाजपच्या तर त्या खालोखाल शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आल्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला सध्या तरी 05 जागा आल्या आहेत. बारामती, शिरूर, रायगड, धाराशिव आणि परभणी. यातील परभणीची जागा तर राष्ट्रवादीच्या कोट्यातून रासपला देण्यात आली आहे.
परभणीतून रासपचे उमेदवार महादेव जानकर Mahadev Jankar हे निवडणूक लढवत आहेत. बारामती आणि शिरूर या दोन ठिकाणी अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट या दोन पक्षांत सरळ लढत होत आहे तर रायगड आणि धाराशिव या दोन ठिकाणी अजित पवार गट विरुद्ध ठाकरे गट या दोन पक्षांमध्ये थेट लढत होत आहे. परभणीत रासप आणि ठाकरे गट आमनेसामने उभे ठाकले आहेत.
पंजा Vs घडयाळ यांच्यात आमना-सामना नाहीच !
वरील पाचही लढती पाहिल्या तर राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध काँग्रेस Congress अशी एकही लढत होताना दिसत नाही. शिवाय महायुतीच्या जागा वाटपातील नाशिकचा तिढा अजूनही सुटलेला नाही. शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे दोन्ही पक्ष या जागेवर दावा करताना दिसत आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गट देखील नाशिकमधून छगन भुजबळांना उतरवण्याची तयारी करताना दिसत आहे. त्यामुळं नाशिकची शक्यता सोडल्यास राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला आणखी एखादी जागा येईल, अशी शक्यता नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदरात पडली तरीही ही लढत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी अजिबात होणार नाही. ही जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गटाला सुटली आहे. ठाकरे गटाने याठिकाणी राजाभाऊ वाजे Rajabhau Waje हा आपला उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरवला आहे. एकूणच काय तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला आलेल्या जागांवर काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत होणारच नाही. थोडक्यात, पंजा Vs घडयाळ यांच्यात आमना-सामना होताना दिसत नाही.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.