Beed Lok Sabha Election :'पोलिस संरक्षणात विकासकामे सांगण्याची दुर्दैवी वेळ'; बजरंग सोनवणेंची मुंडे भगिनींवर टीका!

Bajarang Sonawane News : "जर विकास कामे केली तर दोनदा खासदार राहीलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांची उमेदवारी का डावलले, असा सवाल बजरंग सोनवणे यांनी केला. "
Bajarang Sonawane News
Bajarang Sonawane NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : मतदारसंघाचा विकास केला हे भाजप उमेदवाराला पोलिस संरक्षणात सांगत फिरावे लागते, हे मतदारसंघाचे दुर्दैव असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी लगावला. निवडणूक भावनिक नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर लढायला हवी, असे आवाहनही बजरंग सोनवणे यांनी केले.

Bajarang Sonawane News
NCP Ajit Pawar Group: भाजपला जोर का झटका; भुजबळ नसतील तर अरींगळेंना द्या उमेदवारी!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी बजरंग सोनवणे यांना मिळाल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गृहभेटीनंतर मतदारांचे संपर्क दौरे केले आहेत. जर विकास कामे केली तर दोनदा खासदार राहीलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांची उमेदवारी का डावलले, असा सवाल बजरंग सोनवणे यांनी केला. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bajarang Sonawane News
NCP Vs BJP : ... म्हणून अरुणाचलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपविरोधात केली निवडणूक आयोगाकडे तक्रार!

मागील 15 वर्षापासून सलग एकाच कुटुंबात खासदारकी असताना देखील विकास केला नाही. विकास केला असे जनतेला भूलथापा देत असून विकास केल्याचे सांगण्यासाठी त्यांना पोलीस संरक्षणात फिरावे लागणे, म्हणजे या मतदारसंघाचे दुर्दैव असल्याची टिकाही बजरंग सोनवणे यांनी केली.

मागील 10 वर्षापासून सुरू असलेले मतदारसंघातील रस्त्याचे काम अद्याप ही पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी अर्धवट काम राहिल्यामुळे अपघातात लोकांचे बळी जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या आणि राज्यघटनेनुसार आरक्षणाचा अधिकार असताना देखील आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजातील तरुणावर लाठीचार्ज करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोपही बजरंग सोनवणे यांनी केला. भाजपबरोबर आता कोणताही समाज राहिलेला नाही. (Lok Sabha Election 2024)

Bajarang Sonawane News
Mahayuti BJP Politics : महायुतीत झाले १६ भिडू, लोकसभेत जमेना, विधानसभेत काय घडेल?

अशा परिस्थितीत भाजपला आता भावनिक आधार घ्यावा लागतो हे दुर्दैव आहे. निवडणूक भावनिक नव्हे, तर विकासाच्या मुद्द्यावर लढायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले. रमजान ईद निमित्त गुरुवारी बजरंग सोनवणे (Bajarang Sonawane) यांनी बीड शहरातील मुस्लिम बांधवांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या समवेत आमदार संदीप क्षीरसागर होते. लोकसभेची निवडणूक आपण जाती-पातीच्या नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर लढवत असून ही निवडणुक जिंकण्याचा विश्वासही बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला. आपण शेतकरी पुत्र असल्याचा रास्त अभिमान आहे. मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे, म्हणून मी शेतकरी पुत्र आहे.

भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) या बीडमध्ये घर घेणार असल्याच्या मुद्द्यावर बजरंग सोनवणे म्हणाले, जिल्ह्यात माझे एक घर असून राष्ट्रवादी भवन हे देखील पक्षाचे व अर्थात माझेच घर आहे. त्यामुळे मला एक घर असताना दुसरे घर करण्याची आवश्यकता नाही, अशी मिष्किल टिप्पणीही बजरंग सोनवणे यांनी केली.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com