Voting Counting Sarkarnama
पुणे

Pune Transport : पुणेकरांसाठी मोठी बातमी! मतमोजणीच्या दिवशी 'या' मार्गांवरील वाहतूक पूर्ण बंद

Sunil Balasaheb Dhumal

Pune News : पुणे जिल्ह्यातील बारामती, पुणे या दोन लोकसभा मतदारसंघातील मतदानाचे इव्हीएम कोरेगाव येथील गोदामात ठेवण्यात आलेली आहे. आता त्याच ठिकाणी मंगळवारी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येथील वाहतुकीतही बदल केल्याचे प्रशासनाने सांगितले.

पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) गोदामात होणार आहे. या दिवशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोरेगाव पार्क परिसरात तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तसेच, सरकारी आणि खासगी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोरेगाव पार्क परिसरातील वाहतुकीची परिस्थिती लक्षात घेता ४ जून रोजी पहाटे पाच ते सायंकाळी पाच या कालावधीत ब्ल्यू डायमंड चौक ते सर्किट हाउस चौकदरम्यान हलक्या वाहनांची एकेरी वाहतूक सोडण्यात येईल. तसेच, साउथ मेन रस्ता सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहेत. लेन क्रमांक दोन, तीन आणि चार आवश्यकतेनुसार वाहतुकसाठी बंद करण्यात येणार आहे.

याबाबत शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी मतमोजणी दिवशी मुंढवा, कोरेगाव पार्क आणि बंडगार्डन भागातील ताडीगुत्ता, एबीसी फार्म चौक, के. पी. जंक्शन, महात्मा गांधी जंक्शन, ब्ल्यू डायमंड चौक, मोबोज चौक, जहाँगीर चौक, कौन्सिल हॉल चौक, नॉर्थ मेन रस्ता, बंडगार्डन रस्ता आणि कोरेगाव पार्क रस्ता परिसरात दिवसभर वाहतूक कोंडीची शक्यता असल्याचे सांगितले. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असेही आवाहन पवारांनी केले आहे.

पर्यायी मार्ग :

नॉर्थ मेन रस्ता आणि अंतर्गत गल्ल्यांचा वापर करावा लागणार आहे.

पार्किंगची ठिकाणे, वाहन क्षमता

  • पूज्य कस्तुरबा गांधी नॉर्थ मेन रस्ता, कोरेगाव पार्क

(फक्त प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी) - ७००

  • रोही व्हिला लॉन्स, कोरेगाव पार्क लेन क्रमांक सात-

(नागरिकांसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहने) - ७००

  • द पूना स्कूल ॲण्ड होम फॉर द ब्लाइंड ट्रस्ट, नॉर्थ मेन रस्ता, कोरेगाव पार्क

(सर्वांसाठी चारचाकी वाहने) - ९००

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT