sharad pawar sarkarnama
पुणे

Satara Lok Sabha Election 2024 : साताऱ्यातील इच्छुक थेट पवारांनाच म्हणाला, 'कुणी उमेदवार भेटतोय का नाही, तर मी आहेच'

Satara Lok Sabha Election 2024 News : साताऱ्यातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

Uttam Kute

Lok Sabha Election 2024 News : सातारा लोकसभा मतदारसंघात ( Sarata Lok Sabha Election 2024 ) 'हाय व्होल्टेज ड्रामा' सुरू असल्याने तेथील उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. महायुतीकडून तेथे छत्रपती उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) यांचे नावे जवळपास निश्चीत झाले असून, घोषणाच काय ती बाकी आहे, तर महाविकास आघाडीत ही जागा कोणी लढवायची यावरून दोन्ही काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्यानं उमेदवारांचं घोडे अडलेलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांचे अत्यंत विश्वासू, असे श्रीनिवास पाटील ( Shrinivas Patil ) हे साताऱ्याचे खासदार आहेत. पण, त्यांनी या वेळी प्रकृतीचे कारण देत निवडणुकीतून माघार घेतली आहे.

युतीकडून आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी उदयनराजे दिल्लीत काही दिवस तळ ठोकून होते, तर आघाडीकडून तेथे माजी मंत्री आणि आमदार शशिकांत शिंदेंसह अनेक नावे चर्चेत आहेत. त्यामुळे अद्यापही एकाच्या नावावर शिक्कामोर्तब झालं नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परिणामी हा संभ्रम मिटविण्यासाठी नुकतेच शशिकांत शिंदे ( Shashikant Shinde ) हे पवारांना भेटले. "कुणी उमेदवार भेटतोय का नाही, तर मी आहेच," असे शिंदेंनी पवारांना सांगितले. ही माहिती त्यांनी स्वत: पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी (ता.7) मावळमधील आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या पहिल्या मेळाव्यात दिली.

त्यामुळे साताऱ्यात उदयनराजे ( Udayanraje Bhosale )विरुद्ध शिंदे, अशी लढत होण्याची शक्यता आहे. कारण शिंदे हे युतीच्या उमेदवाराच्या तोडीस तोड, आक्रमक आणि भिडणारे असे शरद पवारांच्या विश्वासातील आहेत.

"...तरी भाजपला विश्वास वाटत नाही"

"पक्ष, नेते गेले, तरी कार्यकर्ते असल्याने इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाहीत," असा दावा शिंदेंनी या वेळी केला. "पक्ष आणि नेते फोडले, तरी महाराष्ट्रात चाळीस पार करू, असा विश्वास भाजपला वाटत नाही," असे ते म्हणाले. नवी मुंबई येथे प्रचाराला जायचे असल्याने त्यांनी अगोदर आपल्या आक्रमक स्टाइलनने भाषण केले.

"वाघ कोणाच्या इशाऱ्यावर चालत आहे?"

सगळ्यांना तुरुंगात टाकण्याच्या भाजपच्या भाषेवर त्यांनी बापाचे राज्य आहे का? अशी विचारणा शिंदेंनी केली. "उपमुख्यमंत्री आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली.

तसेच, ते शिवसेनेचे काही उमेदवारही त्यांनी बदलण्यास भाग पाडले आहे. ही राज्याची शोकांतिका असून, हंटर कोणाकडे आहे आणि वाघ कोणाच्या इशाऱ्यावर चालत आहे," असा टोला शिंदेंनी भाजप आणि शिवसेनेला लगावला. "एका पक्षाचे उमेदवार हा दुसऱ्या पक्षाचा नेता ठरवित आहे," अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

"कसब्याची पुनरावृत्ती पुण्यात करणार"

लोकसभा निवडणूक सोपी नसल्याचे शिंदे या वेळी म्हणाले. मात्र, कसब्याची (विधानसभेची) पुनरावृत्ती पुण्यात (लोकसभेला) करणार असल्याचा दावाही त्यांनी केला. "कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस म्हणजे आघाडीचे रवींद्र धंगेकर हे निवडून आले. तेच आता पुणे लोकसभेला आघाडीचे उमेदवार आहेत. आता दयामाया नाही, एक पाय इकडे, एक तिकडे चालणार नाही," असा इशारा देतानाच ज्यांना पक्ष सोडायचा आहे, त्यांनी तो उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी खुशाल सोडावा, असे शिंदेंनी सांगितले.


( Edited By : Akshay Sabale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT