Satara Lok Sabha Constituency : नरेंद्र पाटलांनी घेतली फडणवीसांची भेट; म्हणाले, साताऱ्यातून 'हम भी है रेस में...'

Narendra Patil Meet Devendra Fadnavis : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून सातारा मतदारसंघातून महायुतीमधून ज्या काही इच्छुकांची नावे समोर येत आहेत. त्यामध्ये माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचाही समावेश आहे.

Narendra Patil-Devendra Fadnavis
Narendra Patil-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Satara, 05 April : सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारीवर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही. त्याबद्दल जनतेत कमालीचे औत्सुक्य निर्माण झाले आहे. त्यातच माथाडी नेते आणि २०१९ मध्ये उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक ताकदीने लढलेले माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आज (ता. ५ एप्रिल) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या बंगल्यावर भेट घेऊन 'हम भी रेस में है ' हे दाखवून दिले.

लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून सातारा मतदारसंघातून (Satara Lok Sabha Constituency) महायुतीमधून ज्या काही इच्छुकांची नावे समोर येत आहेत. त्यामध्ये माथाडी नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांचाही समावेश आहे. नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी माथाडी युनियनचे पदाधिकारी, विविध माथाडी बोर्डाच्या टोळ्यांचे मुकादम, उपमुकादम, कामगार व कार्यकर्त्यांनी यापूर्वीच निवेदनाद्वारे भारतीय जनता पक्षाकडे केलेली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)


Narendra Patil-Devendra Fadnavis
Mohite Patil News : बावड्याच्या पाटलांकडे आलेले फडणवीस अकलूजच्या मोहिते पाटलांच्या नाराजीवर बोलणार का?

नरेंद्र पाटील यांना २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने सातारा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांना चार लाख ५२ हजार ४९८ मते मिळाली होती. गेल्या काही वर्षांत त्यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून राज्यभर संपर्क दौरे करून व मोठ्या संख्येने मराठा उद्योजक निर्माण करून चांगली कामगिरी करून दाखवली आहे.

भारतीय जनता पक्षाने (BJP) सोपविलेल्या विविध जबाबदाऱ्याही सक्षमपणे सांभाळल्या आहेत. नरेंद्र पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात निकटचे व जिव्हाळ्याचे संबंध असून, त्यांनी हातावर काढलेला देवेंद्र नावाचा टॅटूही बरेच काही सांगून जातो.

सध्या सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण, याबाबत उत्सुकता ताणलेली असताना आज नरेंद्र पाटील यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. याबद्दल पाटील यांनी स्वतः आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केली आहे. माझे नेते उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. सातारा लोकसभा निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली. फडणवीस यांची प्रत्येक भेट ही ऊर्जा देणारी असते,' असे या पोस्टमध्ये नरेंद्र पाटील यांनी नमूद केले आहे.


Narendra Patil-Devendra Fadnavis
Fadnavis Indapur Tour : पवारांच्या सभेला दांडी मारणाऱ्या दशरथ मानेंची फडणवीसांनी घरी जाऊन घेतली भेट

सातारा लोकसभेचा आढावा फडणवीसांना दिला : नरेंद्र पाटील

या भेटीत उपमुख्यमंत्र्यांना सातारा मतदारसंघाचा आढावा दिला. काय परिस्थिती आहे, ते सांगितले. उमेदवारीबाबतही चर्चा केली. मीसुद्धा लढण्यास इच्छुक आहे. संधी दिली तर सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीतून भाजपकडून लढेन, असे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

R


Narendra Patil-Devendra Fadnavis
Solapur Lok Sabha 2024 : आमदार प्रणिती शिंदेंनी स्वीकारले भाजपच्या राम सातपुतेंचे चॅलेंज

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com