BJP Election Campaign Sarkarnama
पुणे

Mahesh Landge News : अजितदादांचे खासदारकीचे उमेदवार आढळरावांसाठी महेशदादांची जोरदार टोलेबाजी

Lok Sabha Election 2024 : दिलीप वळसेंच्या गैरहजेरीत त्यांची कन्या पूर्वा पार पाडतेय त्यांची जबाबदारी, आढळरावांचा करतेय जोमाने प्रचार

Uttam Kute

Shirur Constituency News : शिरूरमधून लोकसभेला तीव्र इच्छुक, पण ही जागाच पक्षाला न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा झालेले भोसरीचे भाजप आमदार महेशदादा लांडगे (Mahesh Landge News) यांनी ही केवळ चर्चाच असल्याचे गुरुवारी (ता.11) दाखवून दिले. शिरूरमधील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना भोसरीतून या वेळी एक लाखाचे लीड देणार असल्याचा मोठा दावा केला.

गेल्यावेळी 2019 च्या लोकसभेला (Lok Sabha Election 2024) आढळरावांना भोसरीने शिरूर मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 37 हजार 77 मतांची व त्याखालोखाल हडपसरने आघाडी दिली. मात्र, जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या बाकीच्या विधानसभा मतदारसंघात ते पिछाडीवर गेल्याने त्यांचा 58 हजार 483 मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे या वेळी भोसरीतून एक लाखाचे लीड देऊ, असा दावा महेशदादांनी काल केला.

महेश लांडगे काल भलत्याच चांगल्या मूडमध्ये होते. त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधल्याने पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे टेन्शन कमी होऊन ते फ्रेश झाले. उमेदवार येण्याच्या अगोदर आपला चेहरा फ्रेश झाला, तर उमेदवार फ्रेश आणि आपणही असे म्हणत त्यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चार्ज केले. एरव्ही त्वेषाने आणि गंभीर बोलणाऱ्या महेशदादांनी काल विनोदी अंगाने जोरदार भाषण केल्याने त्याला बावनकुळे, आढळरावांसह (Shivajirao Adhalrao Patil) सर्वांनीच मोठी दाद दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बोलण्याच्या ओघात ते शिरूरचा लोकसभेचा आमदार हा महायुतीचा असणार आहे, असे म्हणाले. पण, क्षणात ही चूक त्यांनी दुरुस्त तर केलीच, पण ती करताना हजरजबाबीपणाही दाखवला. शिरूरचा आमदारही महायुतीचा राहील, असं ते आढळऱावांकडे पाहत म्हणाले. त्याला आढळरावांनीही हसून प्रतिसाद दिला.

दिलीप वळसेंची जबाबदारी पार पाडतेय त्यांची कन्या

दरम्यान, राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची जबाबदारी त्यांची कन्या पूर्वा पार पाडत आहेत. आपल्या वडिलांचे मित्र आढळरावांचा प्रचार करताना त्या दिसून आल्या. कवठे यमाई (ता. शिरूर) येथे काल झालेल्या आढळरावांच्या निर्धार मेळाव्याला त्या उपस्थित होत्या. वळसे पाटीलसाहेब यांची प्रतिनिधी म्हणून आल्याचे त्यांनी सांगितले. साहेबांचे सर्व गोष्टींवर बारीक लक्ष असून, त्यांचा संदेश घेऊन आले आहे. आढळरावांना भरघोस मतांनी विजयी करायचे आहे, असे त्या म्हणाल्या.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT