Pune News : गेल्या काही दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार नक्की कोण ? यावर जोरदार चर्चा सुरू आहे. या मतदारसंघातील खासदार डॉ. कोल्हे यांचा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभव करणार, अशी जाहीर घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी पावले टाकायलादेखील सुरुवात केली आहे. (Latest Marathi News)
राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे फडणवीस सरकारला जाहीर पाठिंबा देत अजित पवार आठ महिन्यांपूर्वी सत्तेत सहभागी झाले. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद बहाल केले, तर अजितदादांबरोबर प्रत्येक सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांना मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. यामध्ये दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह अन्य महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने येणारी लोकसभेची निवडणूक एकत्र लढवू मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच जाहीर केलेले आहे. त्यानुसार बारामती तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करून विद्यमान खासदारांचा पराभव करण्याचा संकल्प अजितदादांनी सोडला आहे. त्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभामध्ये कार्यकर्त्यांची मेळावे जाहीर सभा घेऊन अजितदादा आपली भूमिका स्पष्ट करत आहेत.
शिरूर लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील इच्छुक आहेत. मात्र, ही जागा महायुतीच्या जागा वाटपांमध्ये आपण लढणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आढळराव पाटील यांची पंचायत झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री शिंदे यांनी पंधरा दिवसांपूर्वी म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. म्हाडाचे पद देऊन आढळराव पाटील यांची बोळवण केल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha) चूक असल्याने खासदार कोल्हे आणि माजी खासदार आढळराव पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी हे दोन्ही नेते सोडत नाहीत. कोल्हे हे ' फक्त धाकल्या धन्याचे नाव घेऊन पैसे कमावतात'. हे त्यांना शोभत नाही. कोल्हे हे फिल्मी डायलॉग मारणारे खासदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज हे आमच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. ते आमचे आदरस्थान आहेत. मात्र, कोल्हेंनी महाराजांच्या नावाचा वापर व्यापारासाठी, निवडणुकीसाठी करू नये, असा खोचक सल्ला आढळराव पाटील यांनी कोल्हे यांना दिला आहे.
महायुतीच्या जागावाटपात शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा अजित पवार (Ajit Pawar) लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे अजित पवार ठरवतील तो उमेदवार विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून कोल्हे यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.