Diva BJP News : दिव्यात गृहमंत्र्यांना घरचा आहेर; भाजपकडून बंद पुकारल्याने राजकारण तापले

Politics over traders' strike : ठाकरे गटाने जनतेला वेठीस धरण्यापेक्षा त्यांच्या गृहमंत्र्यांना सांगून मारेकऱ्यांवर कारवाई. मनसेनेही तीच भूमिका मांडून बंदला केला विरोध.
Diva
DivaSarkarnama
Published on
Updated on

Thane News : दिवा शहरात व्यापाऱ्यावरती वारंवार होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी दिवा मंडळ भाजपने एकदिवसीय लाक्षणिक व्यापार बंद आंदोलन पुकारले. एकीकडे राज्याचा गृहविभाग भाजपकडे असताना, अशाप्रकारे भाजपकडूनच गृहमंत्र्यांना घरचा आहेर दिल्याचे उघडउघड बोलले जात आहे.

तर दुसरीकडे शिवसेना उबाठा गटाने भाजपने दिवा बंद करून जनतेला वेठीस धरण्यापेक्षा त्यांच्या गृहमंत्र्यांना सांगून मारेकऱ्यांवर कारवाई करावी व व्यापाऱ्यांना न्याय द्यावा, असे म्हटले आहे. तसेच मनसेनेही तीच भूमिका मांडून दिवा बंद आंदोलनाला विरोध दर्शवल्याने आता दिव्यात या बंदवरून राजकारण सुरू झाले आहे.

भाजप (BJP) दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी 'दिवा व्यापारी के सन्मान मे, भाजप मैदान मे... दिवा बंद ... दिवा बंद...' अशी हाक दिली. तसेच दिलेल्या बंदच्या या निर्णयाला दिवा भाजपचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेऊन घडलेल्या निंदनीय घटनेचा निषेध करावा, असे म्हटले आहे. मुळात दिव्यातील मुंब्रा कॉलनी येथील बहुतांश भागातील सोमवारी दुकाने बंदच असतात. त्यामुळे भाजपच्या दिवा मंडळ अध्यक्षांनी दिवा बंद करून दिव्यातील नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले जात असल्याचा आरोप शिवसेना (Shivsena) उबाठा आणि मनसेने केला आहे.

Diva
Eknath Shinde : राज्याचा कारभार हाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे ठाणे पैशांअभावी अस्वस्थ!

दरम्यान, दिवा (Diva) भाजप नौटंकीबाज असून, ते व्यापाऱ्यांची दिशाभूल करत आहेत. जर व्यापाऱ्यांना खरोखर न्याय द्यायचा असेल तर भाजपच सत्तेत आहे. त्यामुळे गुन्हा करणाऱ्यांवर त्यांनी तातडीने कारवाई करत मारेकऱ्याला धडा शिकवला पाहिजे. मात्र, भाजपच्या ताब्यात पोलिस विभाग असतानाही भाजप दिव्यात बंद करणार असेल, तर मग मारेकऱ्यांवर कारवाई करणार कोण? असा सवाल उबाठा दिवा संघटक व दिवा मर्चंट व्यापारी संस्थेच्या अध्यक्षा ज्योती पाटील यांनी केला आहे.

दिव्यातील भाजप नेत्यांना त्यांचेच नेते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर विश्वास नाही, असा याचा अर्थ होतो, असा हल्लाबोल पाटील यांनी केला आहे, तर मनसेचे प्रशांत गावडे यांनी ऐकावं ते नवलचं असे म्हणत, राज्यात तुमचेच गृहमंत्री असताना अशाप्रकारे निषेध म्हणून दिव्यातील दुकाने बंद ठेवायला लागणे म्हणजे कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे द्योतक नाही का? असा सवाल केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय दुकाने बंद ठेवून निषेध करण्यापेक्षा हातात असलेल्या सत्तेचा वापर करून गुन्हेगारांना कडक शासन करून व्यापाऱ्यांना न्याय मिळवून दिला असता, तर ते जास्त सोयीस्कर ठरले असते, असा चिमटा त्यांनी काढला. त्यातच भाजप दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी कोणत्याही व्यापाऱ्यावर बंदामध्ये सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केलेली नाही. या हल्ल्याबाबत पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. त्यांनी सकारात्मक पावले उचलणार असल्याचे स्पष्ट केले. यावरून राजकारण केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

R

Diva
Praful Patel News : जयंत पाटलांच्या मुक्कामावर बोलताना सुळेंचे स्वागत; प्रफुल पटेल नेमकं काय म्हणाले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com