Srirang Barane Sarkarnama
पुणे

Srirang Barane News : 'मावळात महायुतीचा उमेदवार मीच'; बारणेंचा पुनरुच्चार, मात्र शिवसेना की भाजप हे गुलदस्तातच!

Lok Sabha Election 2024 : या वेळी मी हॅटट्रिक करणार असल्याचा दावाही बारणेंनी केला आहे.

उत्तम कुटे: सरकारनामा

Shirur and Maval Lok Sabha Constituencies : पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि मावळ या दोन लोकसभेच्या जागा या वेळी महायुती आणि आघाडी अशा दोघांनीही अत्यंत प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.

दरम्यान, या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीकडून कोणता पक्ष लढणार आणि उमेदवारही ठरला असताना, महायुतीत मात्र घोळात घोळ सुरूच आहे. ही परिस्थिती असताना बुधवारी (ता.6) आणखी यामध्ये सस्पेन्स निर्माण झाल्याचे दिसत आहे.

मावळात मीच महायुतीचा उमेदवार असणार आहे, याचा पुनरुच्चार तेथील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे(Srirang Barane) यांनी बुधवारी 'सरकारनामा'शी बोलताना पुन्हा केला, तर भाजपच्या पिंपरी-चिंचवडकर विधान परिषद सदस्या उमा खापरे यांनी मावळ मतदारसंघ कमळावरच लढवला जाण्याची आग्रही मागणी केली आहे. मतदारसंघात पक्षाचे तीन आमदार असून, पिंपरी-चिंचवड व पनवेल महापालिकेत भाजपची सत्ता होती.

मावळचे राष्ट्रवादीचे आमदार हे पूर्वी भाजपमध्येच (BJP) होते. अशारितीने मावळात पक्षाची जास्त ताकद असल्याने तेथील लढत कमळावरच व्हावी, मग उमेदवार कोण याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे खापरे म्हणाल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यावर बोलताना कमळावर लढणार का, या प्रश्नाला बारणे यांनी खुबीने उत्तर देणे टाळले. तो निर्णय महायुतीचे नेते घेणार असून, त्यावर भाष्य करून मी संभ्रम निर्माण कऱणार नाही, असे चतुराईचे उत्तर त्यांनी दिले. तसेच सुरुवातीपासून मावळात युतीचाच उमेदवार विजयी होत असून, या वेळी मी हॅटट्रिक करणार असल्याचा दावा त्यांनी केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ग्रीन सिग्नल दिल्याने बारणेंनी आपली उमेदवारी अगोदरच जाहीर करून टाकली आहे. मात्र, त्यानंतरही महायुतीमधील भाजपच्या नेत्यांनीही आणि राष्ट्रवादीनेही दावा ठोकल्याने मावळात पेच निर्माण झालेला आहे. राष्ट्रवादीचे मावळ लढवावा, यावर पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके ठाम आहेत.

तर भाजपच्या मावळ कोअर कमिटीने त्यासाठी फडणवीसांची दोनदा भेट घेतली आहे. दुसरीकडे तेथे आघाडीने उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली असून, त्यांनी ठाकरे गटाचे संजोग वाघेरे-पाटील यांना परवानगी देत त्यांचा प्रचार स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सुरूही केला आहे.

मावळसारखा शिरूरलाही महायुतीत पेच कायम -

शेजारच्या शिरूरमध्येही मावळसारखीच स्थिती आहे. तेथेही आघाडीचं ठरलं असून, विद्यमान खासदार राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे त्यांचे उमेदवार आहेत, तर महायुतीत ही जागा कुणी लढायची यावरूनच रस्सीखेच सुरू आहे. कारण शिवसेनेच्या या जागेवर या वेळी राष्ट्रवादीने दावा केला आहे.

मात्र, त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नाही. म्हणून तेथे तीन वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांना आय़ात करण्याचं त्यांचे प्रयत्न दिसत आहेत.पण, त्याला खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील आणि भोसरीचे विलास लांडे-पाटील यांनी कडाडून विरोध केला आहे.

दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) कोल्हेंना पराजित करण्याचे आव्हान देऊन बसले आहेत. त्यांचा पराभव करून शरद पवारांना शह देण्याचा त्यांचा प्लॅन आहे. त्यासाठी ते विजयी होईल अशा उमेदवाराच्या शोधात असून, तो न मिळाल्याने तेथील युतीचा उमेदवार अद्याप अंतिम झालेला दिसत नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT