Loksabha election 2024 : उमा खापरेंनी सांगितला 'मावळ'वर दावा! म्हणाल्या, 'उमेदवार कमळाच्या...'

BJP MLA Uma Khapare claim on Maval Constituency : मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी-चिंचवड आणि पनवेल असे दोन विधानसभा मतदारसंघ येत आहेत. या मतदारसंघांवर आता जरी राष्ट्रवादी कॉंग्रेसची पकड असली तरी तो मतदारसंघ भाजपचाच होता. भाजप मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पिंपरीतदेखील भाजपची ताकद वाढली आहे.
Shrirang Barne, Uma Khapare
Shrirang Barne, Uma KhapareSarkarnama
Published on
Updated on

Maval News : भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांनीही मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे, तर मावळमध्ये उमेदवाराने भाजपच्या कमळाच्या चिन्हावरच निवडणूक लढविली पाहिजे, असे त्यांनी थेटच सांगितले आहे. त्यांच्या या दाव्याने मतदारसंघातील विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे असले तरी ते भाजपमध्ये प्रवेश करतील काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

मावळमधील उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) हे असतील किंवा अन्य कोणी? त्यांनी कमळाच्या चिन्हावरच लढायला हवे, अशी भूमिका खापरेंनी घेतली आहे. याबाबत भाजपच्या चिंचवडमधील आमदार अश्विनी जगताप यांना विचारले असता, आपल्याला याची कल्पना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावरून भाजपच्या आमदारांमध्येच ताळमेळ नसल्याचे दिसत आहे. मात्र, यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाणं आले आहे.

Shrirang Barne, Uma Khapare
Kolhapur Lok Sabha Seat : 'शाहू महाराजांबद्दल आदर असेल तर बिनविरोध...' ; सतेज पाटलांचं विरोधकांना आव्हान!

मावळ लोकसभा (Maval Loksabha) मतदारसंघात पिंपरी-चिंचवड आणि पनवेल असे दोन विधानसभा मतदारसंघ येत आहेत. या मतदारसंघांवर आता जरी राष्ट्रवादी कॉंग्रेसची पकड असली तरी तो मतदारसंघ भाजपचाच होता. कारण मावळमध्ये भाजपप्रणित मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच पिंपरीतदेखील भाजपची ताकद वाढली असून, या मतदारसंघात लोकसभा निवडणूक कमळाच्या चिन्हावर लढवावी, अशी आमची इच्छा आहे. उमेदवारी देण्याचे काम पक्षाच्या हाती असले तरी उमेदवार भाजपचाच हवा, अशी मागणी आम्ही केली असून, त्यावर ठाम असल्याचे उमा खापरे (Uma Khapare) यांनी सांगितले. तसेच भाजपचा जो कोणी उमेदवार असेल, त्या उमेदवाराला निवडून आणण्याचे काम आम्ही करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चिंचवडमधील भाजपच्या आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबत विचारले असता, त्यांनी मावळमध्ये भाजपचा उमेदवार असावा, असे आम्हाला वाटत असल्याचे सांगितले, तर महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत, अशी भूमिकाही त्यांनी या वेळी मांडली.

दरम्यान, उद्धव ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केला असून, आमची लढत भाजपसोबत असल्याचे थेटच सांगितले आहे, तर शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मीच महायुतीचा उमेदवार असल्याचे ठामपणे सांगितले आहे, पण कमळ चिन्हावर लढणार की धनुष्यबाणावर? याबाबत बोलताना त्यांनी 'मी महायुतीचा उमेदवार असल्याचे म्हटले आहे.

R

Shrirang Barne, Uma Khapare
Thane Namo Maharojgar Melava : भाईंपुढे अजितदादांचे काही जमेना; ठाण्यातील दौरा रद्द

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com