Jayant Patil News Sarkarnama
पुणे

Lok Sabha Election 2024 : तीन जागा सोडल्याबद्दल जयंत पाटील यांनी मानले भाजपचे आभार !

Lok Sabha Election Jayant Patil On Bjp : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी भाजपची खिल्ली उडवली...

Chaitanya Machale

Jayant Patil On Bjp LokSabha Mission :

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याचा संकल्प सोडला आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत 'मोदी है तो गॅरंटी है' यावर भाजपने निवडणूक लढवून विजय मिळविला. लोकसभेसाठी राज्यातील 45 जागा जिंकण्याचा निश्चय करत तशी घोषणा भारतीय जनता पक्षकडून केली जात आहे.

भाजपच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रचारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मिश्कील टोला लगावला आहे. 48 पैकी 45 जागा जिंकण्याचा निश्चय केलेल्या भाजपने तीन जागा आम्हाला सोडल्या याबद्दल त्यांचे आभार मानतो, अशा शब्दांत पाटील यांनी भाजपची खिल्ली उडविली. मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आयोजित बैठकीसाठी गुरुवारी जयंत पाटील आले होते. त्यावेळी उपस्थित पत्रकारांशी ते बोलत होते.

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे. यावर बोलताना पाटील म्हणाले, प्रतोद कोण योग्य आहे, हे सुप्रीम कोर्टाने याआधी ठरवलं होतं, पण कोर्टाने दिलेला निर्णय डावलून नार्वेकर यांनी हा निर्णय घेतला. काल कोणताही सभासद अपात्र झाला नाही, यावरूनच सर्व काही लक्षात येते. आमची केस दाखल असली तरी अजून त्याला बराच वेळ लागणार आहे. दोन्ही गटांचे म्हणणे अजून मांडायचे बाकी आहे. त्यामुळे कालच्या निकालामुळे लगेच आमची धाकधूक वाढली असे काही नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निकालाच्या आधी राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामुळे संशय वाढला आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असे काही घडल्याचे दिसत नाही. जागावाटपाबाबत मित्रपक्षाबरोबर चर्चा सुरू आहे. अजून काही बैठका होतील, त्यानंतर निर्णय होईल. नगरच्या जागेबद्दल अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. तीन पक्षात निर्णय झाला की उमेदवार तयार झाला की सांगू, असे पाटील म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीमध्ये यावे, यासाठी आंबेडकर यांच्याशी आमचे बोलणे सुरू आहे. लवकरच त्याबाबत निर्णय होईल. शरद पवार यांचे वय काढले जाते, यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ज्यांना त्यांच्याविषयी बोलायचे आहे. त्यांनी बोलत राहावं. पवार यांना आता लोकांचा खूप पाठिंबा मिळाला आहे.

edited by sachin fulpagare

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT