Lokmanya Tilak National Award  Sarkarnama
पुणे

PM Modi On Lokmanya Tilak Award: टिळक हे भारतीयांच्या कपाळावरील टिळा; पुरस्कारानंतर माझी जबाबदारी वाढली..

सरकारनामा ब्यूरो

Pune News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने आज पुण्यात गौरविण्यात आले. डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते मोदी यांचा पुणेरी पगडी, सन्मानपत्र, गीतारहस्य ग्रंथाची गुजराती भाषेतील प्रत देऊन सन्मान करण्यात आला. "महात्मा गांधींनी टिळकांना आधुनिक भारताचा निर्माता म्हटले. टिळकांनी शिवजयंतीचे आयोजन सुरू केले. टिळक भारतीयांच्या कपाळावरील टिळा आहे," असे मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, "पुरस्कार घेताना मी उत्साही अन् भावुक आहे. आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. अण्णा भाऊ साठे यांची जयंती. लोकमान्य टिळक स्वातंत्र्याच्या इतिहासाच्या माथ्यावरचा टिळक आहेत. सोबत अण्णा भाऊ यांनी समाजसुधारणेसाठी दिलेले योगदान असाधारण आहे.मी दोघांनाही श्रद्धापूर्वक नमस्कार करतो,"

"आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा असून हा पुरस्कार माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. या पुरस्काराचा निधी नमामि गंगे प्रकल्पाला देणार आहे. या पुरस्कारानंतर माझी जबाबदारी वाढली आहे," असे मोदी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, "देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायाच्या काळात लाल महालात झाला. शिवरायांची लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं कापली. हिंदवी स्वराज्याचा पाया शिवरायाची रचला. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केलं. लोकमान्यांनी स्वराजाचे आंदोलन केले. केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजाचा घाम फोडला. टिळक आणि महात्मा गांधींचे योगदान आम्ही विसरु शकत नाही,"

देशात पुणे शहराचे वेगळं महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास पूर्ण जगाला माहित आहे.त्यांचा जन्म याच जिल्ह्यात, याच शहरात झाला. त्यांनी येथे आपले बालपण घालवले. हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी शिवाजी महाराज लढले. त्यांनी भोसल्यांचे राज्य नव्हे तर हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य उभे केले. हा गौरवशाही इतिहासाचा भाग आहे. पुढच्या काळात या देशाच्या जवानांनी देशाचे रक्षण करण्यासाठी एक प्रकारचे सर्जिकल स्टाइक केले होते. त्याची चर्चा आता होते. देशाचा पहिला सर्जिकल स्टाइक शिवछत्रपतींच्या काळात झाला,"

दीपक टिळक यांनी प्रास्ताविक केले. टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार, टिळक ट्रस्टचे पदाधिकारी सुशीलकुमार शिंदे, डॉ. दीपक टिळक, रोहित टिळक उपस्थित.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT