PM Modi Visit In Pune : विरोधकांनी मोदींना दाखवले काळे झेंडे ; "मणिपूरला जायला हवे होते, मोदींचे पुण्यात काय काम ?

Lokmanya Tilak National Award : पोलिसांनी काही विरोधकांना ताब्यात देखील घेतले आहे.
Lokmanya Tilak National Award
Lokmanya Tilak National Award Sarkarnama
Published on
Updated on

Pune : टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यात आगमन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, विविध सामजिक संघटनांनी मोदींच्या विरोधात आंदोलन केले.

ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाकडून मोदींना काळे झेंडे दाखविण्यात आले. मंडई परिसरात कार्यकत्यांनी काळे झेंडे घेऊन आंदोलन केले. या आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आले. पोलिसांनी काही विरोधकांना ताब्यात देखील घेतले आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, रमेश बावगे, मोहन जोशी यांच्यासह काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.

Lokmanya Tilak National Award
CM On Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्ग अपघाताबाबत मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश; मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

"पंतप्रधानांनी मणिपूरला जायला हवे होते, त्यांचे पुण्यात काय काम?," अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे आठ वर्षांनंतर एका व्यासपीठावर येणार आहेत. या कार्यक्रमानिमित्त भाजप शक्तीप्रदर्शन केले. शहरात ठिकठिकाणी भाजपचे झेंडे, मोदींच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते.

Lokmanya Tilak National Award
Ajit Pawar on Sharad Pawar : साहेब अन् दादा वेगळे नाहीत ; अजितदादा असं का म्हणाले ?

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टकडून नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही या प्रसंगी व्यासपीठावर असतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com