Tilak National Award Sarkarnama
पुणे

Sharad Pawar Speech: देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायाच्या काळात..; पवार म्हणाले, "टिळकांचे योगदान विसरु शकत नाही..

Sharad Pawar Speech at Tilak Puraskar Sohala: केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजाचा घाम फोडला.

सरकारनामा ब्युरो

Modi Visit In Pune : "लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार" पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांना डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. पवारांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यांची महती सांगितले.

पवार म्हणाले, "देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायाच्या काळात लाल महालात झाला. शिवरायांची लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं कापली. हिंदवी स्वराज्याचा पाया शिवरायाची रचला. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केलं. लोकमान्यांनी स्वराजाचे आंदोलन केले. केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजाचा घाम फोडला. टिळक आणि महात्मा गांधींचे योगदान आम्ही विसरु शकत नाही,"

देशात पुणे शहराचे वेगळं महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास पूर्ण जगाला माहित आहे.त्यांचा जन्म याच जिल्ह्यात, याच शहरात झाला. त्यांनी येथे आपले बालपण घालवले. हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी शिवाजी महाराज लढले. त्यांनी भोसल्यांचे राज्य नव्हे तर हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य उभे केले. हा गौरवशाही इतिहासाचा भाग आहे. पुढच्या काळात या देशाच्या जवानांनी देशाचे रक्षण करण्यासाठी एक प्रकारचे सर्जिकल स्टाइक केले होते. त्याची चर्चा आता होते. देशाचा पहिला सर्जिकल स्टाइक शिवछत्रपतींच्या काळात झाला,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT