Prakash Ambedkar, Devendra Fadanvis sarkarnama
पुणे

Loksabha election 2024 : 'ते' बारा टक्के मतदान भाजपचेच; परिणाम भोगावे लागतील : प्रकाश आंबेडकर

Vanchit Bahujan Aghadi वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे त्यांच्या प्रचारासाठी पुण्यामध्ये आले असता, प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी घटत आहे.

Sudesh Mitkar

Pune News : लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील दोन टप्प्यांतील मतदान झाले आहे. आता तिसऱ्या टप्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे. मागील दोन टप्प्यांमध्ये देशात गेल्यावर निवडणुकीच्या तुलनेत कमी मतदान झाले आहे. देशात 12 टक्के मतदान झाले नाही. ते मतदान भारतीय जनता पार्टीचं आहे आणि याचा परिणाम त्यांना भोगावा लागणार आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे त्यांच्या प्रचारासाठी पुण्यामध्ये आले असता प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी घटत आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणाचा विजय होईल हे कोणीही नक्की सांगू शकत नाही. विजय होणारा उमेदवार हा फक्त पंधरा ते वीस हजार मतांनी विजयी होणार आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना यामध्ये मतदान ट्रान्फर होत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हे काँग्रेसचे मतदार असलेल्या मुस्लिमांकडे वळालेले आहेत. त्यांचे मतदान आपल्याला व्हावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मात्र, मुस्लिम मतदार ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत तुम्ही एकत्र राहणार का ? असा सवाल विचारत असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.

महाराष्ट्रामध्ये 12 मतदारसंघांत उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढाई पाहायला मिळते. मात्र, या मतदारसंघांतील सेक्युलर मतं जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जात होती. ती आता वंचित बहुजन आघाडीकडे वळाली असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं. आंबेडकर म्हणाले, शासनाने कबूल केले आहे की 17 लाख कुटुंबांनी भारत सोडला आहे. आणि ते विदेशात जाऊन वसले आहेत.

या सर्व कुटुंबांवर इलेक्ट्रॉल बॉण्डची सक्ती केली होती का? असा प्रश्न आहे. नागरिकत्व सोडलेले सगळे हिंदू आहेत. हा मुद्दा काँग्रेसकडून उचलण्यात येत नसल्याचा आरोपदेखील आंबेडकरांनी केला. वसंत मोरे यांनी मुस्लिमांची बाजू घेतली म्हणून त्यांना डावललं जात होतं. त्यामुळे बहुसंख्य मुस्लिम मतदार वसंत मोरे यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत म्हणून पुण्यातील रेस फार क्लोज होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटली त्यामध्ये एक जण कोणीतरी राहील आणि एकजण कोणीतरी संपेल. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांनी रेल्वेला एक पत्र दिले. मतदानादिवशी 26 विशेष गाड्या उत्तर प्रदेशाने बिहारला सोडाव्यात. हा मतदार भारतीय जनता पार्टीचा आहे.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT