Vanchit Bahujan Aaghadi : 'वंचित बहुजन आघाडी'ची सातवी उमेदवार यादी जाहीर!

VBA and Loksabha Election : जाणून घ्या, कोणत्या मतदारसंघांचा करण्यात आला आहे समावेश!
Vanchit Bahujan Aghadi
Vanchit Bahujan Aghadi Sarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : वंचित बहुजन आघाडीने शनिवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. या यादीमधून दोन मतदारसंघामध्ये उमेदवारांच्या नावांची घोषणा केली गेली आहे.

एकीकडे महाविकास आघाडी तसेच महायुतीमधील घटक पक्षांमध्ये अद्यापही काही जागांवरून ओढातान सुरू असताना, दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभरात उमेदवार देण्याचा धडका सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vanchit Bahujan Aghadi
Prakash Ambedkar News : 'भाजपला एकनाथ शिंदेंची गरज संपली, पुढच्या दोन महिन्यात...' आंबेडकरांचा खळबळजनक दावा

'वंचित'च्या सातव्या यादीत 'या' उमेदवारांची घोषणा -

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मावळ लोकसभा मतदारसंघातून माधवी जोशी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, शिरुर लोकसभा मतदारसंघातून आफ़ताब अनवर मक़बूल शेख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमिताने सर्वत्र प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. 'लोकसभा निवडणुकीमध्ये जागावाटपावरून महायुतीमध्ये तिढा आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेऊनही भाजपला हवा तेवढा फायदा होताना दिसत नसल्याचे अनेक सर्व्हे सांगत आहेत. जागा वाटपावरून महायुतीत अजुनही तिढा आहे. त्यात लोकसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी तु्म्हाला एकनाथ शिंदे दिसणार नाहीत.' असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Vanchit Bahujan Aghadi
Lok Sabha Election 2024 : निवडणुकीआधीच बसपाचा उमेदवार एक उमेदवार आऊट; मायवतींना झटका..

भाजप फक्त लोकसभा निवडणुकी पुरता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा वापर करत असल्याचा दावा काही नेते करत होते. आता प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) शिंदे यांचा फायदा भाजपला होताना दिसत नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वेगळं चित्र दिसू शकते. असे म्हणत शिंदे गटाचे टेन्शन वाढवले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com