Pimpri- Chinchwad Latest News Sarkarnama
पुणे

Pimpri- Chinchwad News : राज्यमंत्रीपद हुकलं,आता महामंडळाचे अध्यक्षपद, तरी मिळणार का?

Pimpri- Chinchwad News : भाजपची राज्यमंत्रीपदाची संधी गेली, आता मंत्रीपदासाठी राष्ट्रवादीकडून फिल्डींग

उत्तम कुटे

Pimpri- Chinchwad News: पिंपरी-चिंचवडला प्रथमच मंत्रीपद मिळण्याची आशा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात चालून आली होती. पण, नुकत्याच (२ जून)ला झालेल्या राजकीय भुंकपामुळे ती हुकल्यात जमा आहे. त्यानंतर आता राज्यातील सत्तेत नव्याने सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

राज्यमंत्री पद मिळाले,तर पिंपरी-चिंचवडचा या पदाचा बॅकलॉग भरून निघणार आहे.म्हणून शिंदे-फडणवीस सरकारामध्ये शहरातील भाजपच्या दोन्ही दावेदार आमदारींनी केली होती. ते मिळण्याची आशा मंत्रीमंडळ विस्तारात निर्माणही झाली होती.पण,गेल्या रविवारी राज्यातील सत्तेत राष्ट्रवादीचा अजित पवार गट सामील झाला अन् हा विस्तार (भाजप-शिंदे शिवसेना आमदारांचा मंत्री म्हणून शपथविधी) झालाच नाही.बंडखोर राष्ट्रवादी कानमागून येऊन तिखट झाली.सत्तेत सामील झाली त्याच दिवशी त्यांच्या नऊ आमदारांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.त्यातून मंत्रीपदाचा कोटा भाजपचा कमी झाला.त्याचा फटका ओघाने पिंपरी-चिंचवडकरांना बसला आहे.

शहरातील भाजप आमदाराला मंत्रीपद मिळण्याची संधी कमी होताच नव्या राजकीय समीकरणात राष्ट्रवादीने आता ती घेण्याचे ठरवले आहे. पिंपरी शहरात तीनपैकी एक आमदार राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आहेत. २००९ नंतर २०१९ ही त्यांची दुसरी टर्म आहे. अजित पवारांच्या २०१९ च्या आणि आताच्या २०२३ च्या बंडातही ते त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत राहिले आहेत. त्यामुळे त्यांचा राज्यमंत्रीपदासाठी विचार करावा,असा जोर त्यांच्या समर्थकांनी लावला आहे. राष्ट्रवादीच्या लिगल सेलचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अॅड.संजय दातीर-पाटील,खेड़ आणि मावळ तालुका अध्यक्ष अॅड.अतिश लांडगे यांनी मंगळवारी (ता.४)अजितदादांना भेटून आ.बनसोडे यांना मंत्री करण्याची लेखी मागणी केली आहे.

दरम्यान, मंत्रीपद मिळाले नाही, तर त्या दर्जाचे महामंडळाचे अध्यक्षपद तरी मिळावे,यासाठी प्रयत्न पिंपरी-चिंचवडकर वासीयांकडून आता सुरु झाले आहे.कारण गेल्या अडीच वर्षापासून शहर अध्यक्षपदापासूनही वंचित आहे. याआधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योगनगरीला राज्यमंत्री दर्जाचे पद म्हणजे महामंडळाचे अध्यक्षपदही देण्यात आले नव्हते. त्याअगोदर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तीन महामंडळ तथा प्राधिकरण अध्यक्षपदे म्हणजे राज्यमंत्रीपदाची पदे शहराकडे होती.अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ आणि लोकलेखा समिती आणि पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अनुक्रमे अमित गोरखे, अॅड.सचिन पटवर्धन आणि सदाशिव खाडे होते.तर,त्याआधी दोन्ही काँग्रेसच्या सरकारमध्ये २०११ ला शहरातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे हे राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष होते.

Edited by : Rashmi Mane

SCROLL FOR NEXT