Ramraje Nimbalkar Ranjitsinh Naik Nimbalkar Sarkarnama
पुणे

Madha Loksabha News : अजितदादांपुढे कार्यकर्त्यांचे गाऱ्हाणे; माढ्यात निंबाळकर सोडून कोणताही उमेदवार द्या, जोमाने काम करू

Sudesh Mitkar

Pune News : माढा लोकसभा मतदारसंघातील तिढा सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माढा येथील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ज्या बैठकीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे गाऱ्हाणे मांडत भाजप उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकरांची प्रचार करण्याची आमची मानसिकता नाही, उमेदवार बदलण्याचा विचार करा, असा सूर राष्ट्रवादीच्या पदाधिकऱ्यांनी आवळला.

माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून इच्छुक होते. मात्र, पक्षाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा तिकीट दिले आहे, त्यामुळे मोहिते-पाटील हे नाराज झाले आहेत. धैर्यशील मोहिते-पाटील हे माढा मतदारसंघातील गावागावांत फिरून प्रचार करत आहेत. (Madha Loksabha News )

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचाही रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध आहे. भाजपने माढ्यातील उमेदवार बदलावा, अशी मागणी त्यांनी केलेली आहे. भाजपने आपला उमेदवार बदलला नाही तर कमी मते पडल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

रामराजे यांच्या गटाने मेळावा घेऊन आपली नाराजी बोलून दाखवली होती, या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बैठक घेतली. त्या बैठकीला आमदार रामराजे निंबाळकर,आमदार दीपक चव्हाण, आमदार मकरंद पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्यासाठी आलोय

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील (Ncp) एकाही कार्यकर्त्यांची त्यांचा प्रचार करण्याची इच्छा नाही. आम्ही बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्यासाठी, अजितदादा तुमच्यासमोर आलोय. भाजपचा आणि उमेदवाराचा सगळा एक कलमी कार्यक्रम आहे. त्यामुळं तुम्ही भाजपचा (Bjp) उमेदवार बद्दलण्याबाबत विचार करावा. भाजपच्या वरिष्ठांना हे कळवावे. निंबाळकर सोडून कोणताही उमेदवार द्या, आम्ही जोमाने काम करू आणि त्यांना खासदार बनवू, असे म्हणणे बैठकीत मांडण्यात आले.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT