Ajit Pawar News : बारामतीत वंचितचा उमेदवार; यावर अजित पवार स्पष्टच म्हणाले...

Political News : वंचित आघाडीने बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार दिल्यास त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो, असे बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपली वंचित आघाडीबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama

Pune News : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये 'एकला चलो'ची भूमिका घेतली आहे. ही भूमिका घेताना वेळ पडल्यास बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये आपला उमेदवार उभा करणार असल्याचेदेखील स्पष्ट केला आहे. वंचित आघाडीने बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार दिल्यास त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो, असे बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपली वंचित आघाडीबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पैलवानांचा मेळावा बुधवारी पुण्यामध्ये पार पडला. या मेळाव्यानंतर अजित पवारांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, उद्या महायुतीची प्रेस आहे. महायुतीच्या लोकसभेच्या जागावाटपाबाबत चित्र उद्या स्पष्ट होईल. आज कुस्तीपटू यांच्याशी बैठक झाली. या बैठकीनंतर सातारा, माढा, नाशिकमधील काही जण भेटायला येणार आहेत. त्यांच्यासोबत लोकसभा मतदारसंघाबाबतच्या चर्चा होणार आहेत. राज्यातून महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून जातील, यासाठी नियोजन करण्यात येत आहे. (Ajit Pawar News)

Ajit Pawar
Lok Sabha Election 2024 : 'मी लढणार अन् ठाकरेंच्या उमेदवाराला नडणार'; ठाकरेंची डोकेदुखी वाढली, बंडखोरी उफाळली...

सातारा येथील लोकसभेच्या जागेबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या नेत्यांकडून वेगवेगळी स्टेटमेंट येत आहेत. यावर अजित पवार म्हणाले, प्रत्येकाने काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही आमच्या लोकांशी चर्चा करतो आहाेत. गेल्या काही दिवसांपासून दादांचा फोटो बातम्या दिल्या जात आहेत. राष्ट्रवादीला फक्त तीन जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहेत. माध्यमांनी वस्तुस्थिती सांगावी, मात्र कोणताही आधार नसताना बातम्या देऊ नयेत, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

गेले दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका सुरू आहेत. विविध नेते भेटीला येत आहेत. कालच्या बैठकीला छगन भुजबळ हे येऊ शकले नाहीत. त्याबाबत त्यांनी पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळे ते आज भेटीला येणार आहेत. आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत.

प्रकाश आंबेडकर यांनी 'एकला चलो'ची भूमिका घेतली असून, बारामतीमध्येदेखील उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर अजित पवार म्हणाले, प्रकाश आंबेडकर वंचितचे प्रमुख नेते आहेत. त्यांची महाराष्ट्रामध्ये मोठी ताकद आहे. आपण गेल्या निवडणुकीत पाहिले आहे. वंचितने उमेदवार दिल्याने मागील वेळेस महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. यामध्ये सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, राजेश विटेकर यांसारखे नेते पराभूत झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू असल्याचा आम्ही पाहत होतो. मात्र, शेवटी कोणी कोणाबरोबर जावे हा त्यांचा निर्णय आहे. त्यांनी काय निर्णय घेतला मला माहिती नाही, असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले.

धैर्यशील मोहिते पाटील यांची खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी घेतलेल्या भेटीबद्दल विचारले असता, अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मी माझ्या पक्षाचे उत्तर देऊ शकतो. इतर पक्षातील उमेदवारांनी नेत्यांनी काय करावे, हा त्यांचा अधिकार असल्याचं सांगत यावरती अधिक बोलणं अजित पवार यांनी टाळले. माढा लोकसभा मतदारसंघाबाबत अजून चर्चा सुरू असून, यावर तोडगा निघणार आहे. त्यामुळे पुढील 24 तास थांबा सगळं सांगतो, असेही अजित पवार म्हणाले.

(Edited By : Sachin Waghmare)

R

Ajit Pawar
Ajit Pawar News : राष्ट्रवादीच्या वाट्याला 4 जागा? अजितदादांचं 'हे' उत्तर अन् कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com