Mahavikas Aghadi Sarkarnama
पुणे

Assembly Election 2024 : आघाडीच्या जागावाटपाचा तिढा वाढला, ठाकरेंच्या 'या' मित्रपक्षाने केली 25 जागांची मागणी

Role of Sambhaji Brigade for Assembly Elections 2024 : अशातच शिवसेना ठाकरे गटाचे मित्रपक्ष असलेल्या एका राजकीय पक्षाने ठाकरे गटाच्या कोट्यातून आपल्याला 25 जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. या मागणीमुळे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 20 August : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांच्या जागा वाटपा संदर्भातील प्राथमिक बैठका सुरू आहेत. प्राथमिक बैठकांदरम्यान महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांना समसमान 90 जागांचा फार्मूला सध्या चर्चेत आहे.

अशातच शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे मित्रपक्ष असलेल्या एका राजकीय पक्षाने ठाकरे गटाच्या कोट्यातून आपल्याला 25 जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. या मागणीमुळे ठाकरे गटाबरोबरच महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे.

आगामी विधानसभा निवडणुका महायुतीतील तीन पक्ष विरुद्ध महाविकास आघाडीतील (MVA) तीन पक्ष अशी लढत होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. सर्व प्रमुख राजकीय पक्षांकडून आपण युती आणि आघाडी मध्येच लढणार असल्याचं ठामपणे सांगण्यात येत आहे. असे असले तरीही विधानसभा निवडणुकीचा जागा वाटपाचा पेच हा लोकसभेप्रमाणे सहजासहजी सुटणं शक्य नाही.

लोकसभा निवडणुकीमध्ये आत्मविश्वास वाढल्याने महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्ष आपल्याकडे जास्तीत जास्त जागा घेण्याच्या प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत फटका बसलेले महायुतीतील तिन्ही पक्ष विधानसभेला सावध भूमिका घेताना दिसत आहेत.

महाराष्ट्राचे सध्याचे विधानसभेचे चित्र पाहिल्यास प्रत्येक मतदारसंघांमध्ये साधारण तीन ते चार इच्छुक प्रमुख राजकीय पक्षांकडून पाहायला मिळत आहेत. त्यामुळे युती आणि आघाडीतील एका पक्षाला ही जागा सुटल्यानंतर इतर दोन पक्षातील नाराजांना शांत करण्याचं आव्हान हे राजकीय पक्षांपुढे आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये बंडखोरांचं मोठं आव्हान सर्वच पक्षांकडे असणार आहे.

आघाडीच्या कोट्यातून आम्हाला 25 जागा मिळाव्यात

अशातच शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचा मित्र पक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला 25 जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. आमची आघाडी ही शिवसेना ठाकरे गटासोबत असून त्यामुळे आम्ही देखील महाविकास आघाडीचा एक घटक आहोत, असं संभाजी ब्रिगेडचे म्हणणं आहे.

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या कोट्यातून अथवा महाविकास आघाडीच्या कोट्यातून आम्हाला 25 जागा मिळाव्यात अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. लोकसभेला आम्ही जागांची मागणी केली होती. मात्र, त्यावेळेस जागा मिळाल्या नाही. तरीही लोकसभेला महाविकास आघाडीचे काम प्रामाणिकपणाणे केलं असून आता त्याचं फळ विधानसभेला मिळणे आवश्यक असल्याचे मत संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ते संतोष शिंदे यांनी व्यक्त केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT