OBC, Maratha Reservation  sarkarnama
पुणे

OBC, Maratha Reservation : 'काँग्रेसने जे केलं तेच आता भाजप करतयं'; कधी काळी भाजपचा मित्र असणाऱ्या माजी मंत्र्याचा आरोप

Demand for Bharat Ratna : आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नेते मंडळी नायगाव येथे अभिवादन करण्यासाठी जात आहेत. यावेळी ओबीसी समाजातील नेत्यांकडून फुले दांपत्यांस भारतरत्न मिळावा अशी मागणी केली जात आहे.

Aslam Shanedivan

Pune News : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज (ता.३) जयंती आहे. यानिमित्त पुणे येथील नायगाव स्मारकाला अभिवादन करण्यासाठी राज्यातील नेत्यांसह ओबीसी समाजातील नेते येत आहेत. त्यांच्याकडून फुले दांपत्यांस भारतरत्न मिळावा, अशी मागणी केली जात आहे. अशीच मागणी भाजपचा कधी काळी मित्र असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाने केली आहे. तसेच भाजपवर जोरदार हल्ला चढवताना, ओबीसी, मराठा आरक्षणावर आजपर्यंत काँग्रेसने जे केलं तेच आता भाजप करत असल्याचा आरोप केला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय समाज पक्ष भाजपच्या बरोबर आहे. पण नुकत्याच झालेल्या लोकसभेनंतर पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाजपशी फारकत घेत टीका केली होती. आताही त्यांनी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी, मराठा आरक्षणावरून भाजपला इशारा दिला आहे.

काँग्रेसप्रमाणेच भाजप वागतयं

जानकर यांनी ओबीसी, मराठा समाज गेल्या कित्येक वर्षांपासून आरक्षणाची लढाई लढत आहे. मात्र अद्याप त्यांच्या पदरात आरक्षण काही पडलेले नाही. आजपर्यंत काँग्रेसने आम्हाला फक्त झुलवत ठेवले. तेच काम आता भाजप देखील करत असल्याची टीका केली आहे. तसेच ओबीसी, मराठा समाजाने जोपर्यंत स्वतःची ताकद दाखवत नाहीत. तोपर्यंत दोन्ही समाजाला आरक्षण मिळणार नाही, असे दावा केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका

लोकसभा आणि विधनसभेच्या निवडणुका झाल्या असून केंद्रासह राज्यात भाजपचे सरकार आले आहे. आता राज्यातील सर्वसामान्यांसह राजकीय पुढाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. यावेळी महायुतीसह महाविकास आघाडीतील नेते एकला चलोचा नारा देताना दिसत आहेत. जानकर यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाष्य केले आहे. त्यांनी या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले आहे. तर दिल्ली, बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करणार असल्याचेही म्हटले आहे.

पुढील काळात आमचाच मुख्यमंत्री

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव येथील स्मारकाला अभिवादन करण्यासाठी पुढील काळात राष्ट्रीय समाज पक्षाचाच मुख्यमंत्री येईल, असाहा दावा त्यांनी केला आहे.

भुजबळांनी त्यांची झोपडी बांधावी

यावेळी जानकर यांनी भुजबळ यांच्या नाराजीवर भाष्य केले. दुसऱ्याच्या महालात गेल्यावरती काय परिस्थिती निर्माण होते याची प्रचिती आता भुजबळ यांना आली असेल. यामुळे त्यांनी, ज्या पद्धतीने मी माझी झोपडी बांधली त्याच पद्धतीने त्यांची झोपडी बांधावी. त्यांनी समता परिषदेचा एखादा पक्ष काढावा. आम्ही त्यांच्याशी युती करू अशी खुली ऑफर दिली आहे.

भारतरत्न द्या

फुले दांपत्यांचं काम खूप मोठं आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी, आम्ही अनेक वर्षांपासून करतोय. गेल्या 32 वर्षांपासून आम्ही नायगाव मध्ये येऊन ही मागणी करत असल्याचेही जानकर यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT