
Mahadev Jankar News : महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला (रासप) मोठा झटका बसला आहे. स्वबळावर 90 पेक्षा अधिक जागा लढून केवळ एका जागेवर 'रासप'ला विजय मिळवता आला. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रासपचे उमेदवार रत्नाकर गुट्टे विजयी झाले. मात्र, गुट्टे महायुतीला साथ देण्याची शक्यता आहे. त्यावरून महादेव जानकर यांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे.
महादेव जानकर म्हणाले, आम्ही महायुतीत आणि महाविकास आघाडीत नाही. पण जर आमचा आमदाराने पक्षाला न विचारता काही निर्णय घेतला तर त्यावर नक्की आम्ही कारवाई करू. त्यांच्यावर कारवाई करू. कारवाई बाबत निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेईल.
जानकर म्हणाले, मला भाजपचा अनुभव वाईट होता. त्यामुळे मी महायुतीमधून बाहेर आलो आहे.काँग्रेसची सोबत अजून चाखली नाही. त्यामुळे महायुती किंवा महाविकास आघाडीसोबत न जाता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका आहे. आमची एकला चलोची भूमिका असेल.
महादेव जानकर यांना राज्यात सरकार स्थापनेला उशीर होत असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, बहुमत त्यांना मिळाले आहे. 200 पेक्षा अधिक जागा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे सरकार कधी स्थापन करायचे, मुख्यमंत्री कोण होणार हे ते ठरवण्यास समर्थ आहेत. माझ्या सारख्या व्यक्तीने यावर बोलणे योग्य नाही. आम्हाला आमच्या पक्षाचा विस्तार करायचा आहे. त्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.