Umesh Kokre join Congress  Sarkarnama
पुणे

Mahadev Jankar News: कधी आघाडी तर कधी महायुती...,साहेबांच्या धरसोड वृत्तीला कंटाळलो! युवा नेत्याची काँग्रेसमध्ये एन्ट्री

Sudesh Mitkar

Pune News: महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला, काँग्रेसने पुण्यात झटका दिला आहे. 'रासप’चे पुणे शहर युवक अध्यक्ष उमेश कोकरे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना खडकवासला विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर आमदार संजय जगताप, श्रीरंग चव्हाण, लहू निवंगुणे, सचिन बराटे, दत्ता झंजे आदी उपस्थित होते.

महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची उमेदवारी ही जवळपास निश्चित करण्यात आली होती. मात्र अचानक यांनी तो निर्णय बदलला आणि ते महायुतीत दाखल झाले.

लोकसभा निवडणूक त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी सध्या 'एकला चलो'ची भूमिका घेतल्याचा पाहायला मिळत आहे. या धरसोड वृत्तीमुळे पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी नाराजी आहे.

'सरकारनामा'शी बोलताना उमेश कोकरे म्हणाले, "बारामती लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांनी 2014 मध्ये जेव्हा निवडणूक लढली तेव्हापासून मी सक्रियपणे राष्ट्रीय समाज पक्षाचे काम करीत आहे. परंतु नागरिकांच्या जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आता काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

'रासप' हा गेल्या काही वर्षांपासून भाजपसोबत महायुतीत आहे. असे असले तरी कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने संभ्रमावस्था आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे कधी महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतात तर अचानक कधी महाविकास आघाडी सोबत जाणार असल्याचे सांगतात. यामुळे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. पक्ष म्हणून रासपने एक ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. नाहीतर कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काम करणं अवघड होऊन जातं.

लोकसभा निवडणुकीवेळी महादेव जानकर यांनी महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आम्ही महाविकांसाठीच्या बैठकांना देखील हजेरी लावली. अचानक त्यांनी तो निर्णय बदलला आणि ते महायुती सोबत गेले. आता देखील आगामी विधानसभा निवडणुकीत ते स्वतंत्र लढणार असल्याची भाषा करत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे.

गेले काही काळापासून आमच्याकडे येणाऱ्या नागरिकांची अडकलेली कामे ही रासप पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून होणे आवश्यक होतं. मात्र ती कामे काँग्रेसच्या नेत्यांनी मार्गी लावली. त्यामुळे काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून सध्या परिस्थितीत राज्याच्या राजकारणामध्ये देखील काँग्रेस वर्चस्व वाढला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये जाऊन नागरिकांची जास्तीत जास्त काम मार्गी लावण्याचा प्रयत्न असणार असल्याचे कोकरे यांनी सांगितलं. आगामी महापालिका निवडणुकीत संधी देण्याचे आश्वासन देखील काँग्रेसकडून मिळाले असल्याचं कोकरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT