Dilip Walse Patil Sharad Pawar  sarkarnama
पुणे

Dilip Walse Patil : शरद पवारांकडून गद्दार उल्लेख, दिलीप वळसे पाटील म्हणाले, 'लक्ष्यात ठेवा...'

Ambegaon constituency Dilip Walse Patil Sharad Pawar : शरद पवारांनी आपल्या जाहीर सभेत गद्दारांना सुट्टी नाही. वळसे पाटील यांनी गद्दारी केली त्यांना पराभूत करा, असे आवाहन केले होते. त्याला वळसे पाटलांनी उत्तर दिले आहे.

Roshan More

Dilip Walse Patil News: शरद पवारांनी आपल्या जाहीर सभेत गद्दारांना सुट्टी नाही. वळसे पाटील यांनी गद्दारी केली त्यांना पराभूत करा, असे आवाहन केले होते. त्यामुळे शरद पवारांच्या या वक्तव्याविषयी दिलीप वळसे पाटील काय उत्तर देणार याची चर्चा होती. अखेर वळसे पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, 'बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या मी त्यांच्या बद्दल बोलत नाही. मात्र, आपली समारोपच्या सभा 18 तारखेला होणार आहे तेव्हा या प्रश्नाची उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट लक्ष्यात ठेवा.'

दिलीप वळसे पाटल आणि त्यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी आपल्या प्रचारात शरद पवार आणि आमचे 50 वर्षांपासून स्नेहाचे संबंध आहेत. आम्ही साहेबांवर नाराज नाही, असे म्हणत शरद पवारांवर टीका करणार नसल्याचे जाहीर केले होते.

शरद पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ते म्हणतात साहेब आमच्यावर बोलणार नाहीत. पण बोलण्यासारखं तुम्ही काय ठेवलं. तुम्ही गद्दारी केली. शिवछत्रपतींच्यानंतर गणोशी शिर्केने संभाजीराजेंच्या विरोधात गद्दारी केली. हे महाराष्ट्र विसरला नाही. गणोजीला धडा शिकवला पाहिजे. गद्दारांना सुट्टी नाही. गद्दारी केली त्या वळसे पाटलांना पराभूत करा.

शरद पवारांना का सोडले?

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांना का सोडले, याचे उत्तर पूर्वा वळसे पाटील या आपल्या प्रचारसभांमधून देत आहेत. डिंभे धरणाच्या तळाशी बोगदा पाडून धरणातील पाणी हे दुसऱ्या तालुक्यात नेण्याचा डाव आहे. तालुक्याच्या हितासाठी वळसे पाटील साहेबांना काळजावर दगड ठेऊन हा निर्णय घ्यावा लागला, असे पूर्वा पाटील या सांगत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT