Dhananjay Munde, AJit Pawar Sarkarnama
पुणे

Dhananjay Munde : राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या यादीचा सस्पेन्स कधीपर्यंत? धनंजय मुंडेंनी स्पष्टचं सांगितलं

Sudesh Mitkar

Pune News, 17 Oct : आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता सर्वांना राजकीय पक्षाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या उमेदवारी यादीची प्रतीक्षा आहे. मात्र, या याद्या राजकीय पक्ष कधी जाहीर करणार याबाबतचा सस्पेन्स कधीपर्यंत राहणार याबाबतचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (अजित पवार) पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

पुणे (Pune) दौऱ्यावर आलेले मंत्री धनंजय मुंडे माध्यमांशी बोलताना उमेदवारांच्या यादीवर भाष्य केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची पक्षाची पहिली उमेदवार यादी कधी येणार याबाबत सगळ्याच पक्षांमध्ये सस्पेन्स राखला जातो.

22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांत पहिल्या यादीबाबत सस्पेन्स राहणारच, असं मुंडे म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे.

यावर बोलताना मुंडे म्हणाले, "निवडणुका आल्यानंतर पक्षांमध्ये आयाराम गयाराम हे सुरूच असतं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सध्या सॉफ्ट टार्गेट बनवत आहे. आमच्याकडे देखील अनेक विद्यमान आमदार येत आहेत. मात्र त्याकडे माध्यमांचा लक्ष नाही.

यंदाच्या निवडणुका महाविकास आघाडी आणि महायुती (Mahayuti) मधील तीन-तीन पक्ष एकत्रित येऊन लढत आहेत. त्यामुळे युती आणि आघाडीत कोणता विधानसभा मतदारसंघ कोणाला सुटेल हे सांगता येत नाही. येथील स्थानिक नेत्यांची आमदार होण्याची महत्वकांक्षा असेल आणि त्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता नसेल तर तो इतर पक्षांचा विचार करतो आणि इथेही सध्या तेच पाहायला मिळत आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar) हे विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने राजीनामा देणार आहेत. या संदर्भात प्रश्न विचारला असता म्हणाले, दीपक मानकर हे मला नाराज दिसत नाहीत. मात्र, जर ते नाराज असतील तर पक्ष नेतृत्व त्यांची नाराजी नक्कीच दूर करेल.

एका भाषणादरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे महत्त्वाच्या भूमिकेत असतील असं सुतोवाच शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे जयंत पाटील हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असतील शा चर्चा सुरू झाल्या आहेत.

याबाबत धनंजय मुंडे म्हणाले, याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना विचारणे आवश्यक आहे. त्यांना मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील मान्य आहेत का? हे त्यांना विचारलं पाहिजे, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT