Chandrashekhar Bawankule : 'महाविकास आघाडीतील नेते मुख्यमंत्री पदासाठी हापापलेले', बावनकुळेंचे टीकास्त्र!

Chandrashekhar Bawankule on Mahavikas Aghadi News : उद्धव ठाकरे यांची परिस्थिती बिकट आहे, ते दिल्लीत कटोरा घेऊन गेले होते. ही वेळ का आली याचं त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं, असंही बावनकुळेंनी म्हटले आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Ichalkaranji BJP Politics : माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या कार्यकर्ता मेळावानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. इचलकरंजी भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी या मेळाव्याच्या निमित्ताने उघड झाली. आमदार प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे हे या व्यासपीठावर उपस्थित नव्हते.

त्यावरून बोलताना बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी, 'मी आवाडे यांच्या घरी चहासाठी जाणार आहे. इतके दिवस विरोधात असताना आता सामावून घेण्यास वेळ लागतो. पण मला अभिमान आहे, हाळवणकर यांनी सहकार्याची भूमिका घेतली. हे करत असताना हाळवणकर यांना योग्य न्याय दिला जाईल.'

इचलकरंजी मतदारसंघात भाजपचा उमेदवार बहुमताने निवडून येईल. निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेत्यांना माझा सलाम आहे. त्यांनी मोठे मन करून पक्षामध्ये आमदार आवाडे पिता पुत्रांचा सन्मान केला. हाळवणकर यांना न्याय मिळावा यासाठी केंद्रीय नेत्यांना विनंती करणार असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Chandrashekhar Bawankule
Ravi Rana News : रवी राणांमुळे भाजपात असंतोष, बंडखोरी अटळ!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट होणार अशा पद्धतीची माहिती समोर आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. अशा पद्धतीच्या बातम्या तुमच्यापर्यंत येतात. मात्र अशी कोणतेही चर्चा नाही. केंद्रीय निवडणूक समितीसमोर प्रेझेंटेशन केले आहे.

ही समितीच यादी जाहीर करणार आहे. तेच योग्य माहिती देतील. या सर्व कथित बातम्या आहेत. कोणाचा पत्ता कट होणार नाही. भाजपच्या(BJP) जागा भाजपला येणार आहेत. शिवसेनेच्या जागा शिंदे गटाला जाणार आहेत आणि राष्ट्रवादीच्या जागा अजित पवार गटाला जाणार आहेत. उर्वरित जागांवर पुन्हा बैठक होणार आहे. आणि जिंकण्यासाठीच आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

याशिवाय बावनकुळे म्हणाले 'महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा लागली आहे. शरद पवार हे आधी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करणार होते. त्यानंतर शरद पवार हे सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करणार होते. आता ते जयंत पाटील यांचं नाव घेत असल्यास बावनकुळे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांची वाईट स्थिती आहे. दिल्लीला कटोरा घेऊन गेले, तर त्यांना परत पाठवले, त्यांचं वाईट वाटतंय. त्यांना दिल्लीला जाऊन राहुल गांधी आणि सर्वांना भेटावे लागते. त्यांच्यावर का ही वेळ आली याचे त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे.'

Chandrashekhar Bawankule
MLA Satish Chavan News : `तुतारी` हाती घेण्याआधीच सतीश चव्हाण विरोधाचे `नगारे` वाजू लागले

तसेच 'महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा आहे. आमच्याकडे विकास कामासाठी मुख्यमंत्री पाहिजे. आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवणार आहोत. मुख्यमंत्री पदासाठी हापापलेली ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार यांची टीम आहे. त्याच स्वप्न पूर्ण होणार नाही.' असे आव्हान बावनकुळे यांनी दिले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com