Raj Thackeray Sarkarnama
पुणे

Raj Thackeray: तिकीट नाकारलेल्या बंडखोरांवर मनसे लावणार डाव? ताकदवान उमेदवारांना वळवणार

Sudesh Mitkar

Pune News: पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांसह पश्चिम महाराष्ट्रातील 58 विधानसभा मतदारसंघाच्या मॅरेथॉन बैठका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंकडून आज पुण्यात घेण्यात येत आहेत. मतदारसंघातील परिस्थिती आणि इच्छुकांचा आढावा या बैठकांच्या माध्यमातून राज ठाकरे घेत आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यभरामध्ये मनसेने आपले उमेदवार दिले नव्हते त्या उलट त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना आपला पाठिंबा दर्शवला होता. असं असलं तरी आता विधानसभा निवडणुकीला राज ठाकरे यांनी एकला चलो ची भूमिका घेतली आहे. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रभर आढावा बैठका घेण्यात येत आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेकडून 288 विधानसभा मतदारसंघांपैकी किमान 200 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याची तयारी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी तिकीट न मिळालेल्या बंडखोरांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याचा प्लॅन देखील पक्षाचा असल्याचा बोलला जात आहे.

सध्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी आणि महायुतीमध्ये पक्षाकडून तिकीट मिळावं यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष सध्या पाहायला मिळत आहे. तिकीट न मिळालेल्या स्ट्रॉंग उमेदवारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न देखील आगामी काळात होणार असल्याचे सांगितले जात आहे.

आज पुण्यातील मनसेच्या नवी पेठ येथील कार्यालयामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न होत आहे, बैठकीमध्ये विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेची असलेली ताकद संभाजी इच्छुक आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराबाबत चर्चा करण्यात येत आहे. आज सायंकाळपर्यंत बैठका सुरू राहणार आहेत.

दरम्यान मनसेकडून एका खाजगी संस्थेला महाराष्ट्रातील दोनशे विधानसभा मतदारसंघाच्या सर्वे करण्यात आले आहे. त्याचबरोबर मनसेचे राज्यातील पदाधिकारी प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये जाऊन त्या ठिकाणच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा करून त्या ठिकाणची परिस्थिती राजकीय गणित संभावित उमेदवार या सर्वांचा एकत्रित असा अहवाल केले आहेत. या धर्तीवर आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT