Jayant Patil: जागा बिनविरोध सोडायची अपेक्षा असेल तर अवघड, मुश्रीफांच्या 'त्या' विधानावर जयंत पाटलांचा टोला

Jayant Patil attack on Minister Hasan Mushrif Kolhapur News:राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे संपलेली आहे.गुंडांच्या हातात राज्यकर्त्यांनी सर्व अधिकार दिलेत असं वाटतंय. सामान्य, माणसं, मुली, महिला घाबरलेल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात हे गृह खाते गंभीर नाही.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आपल्याला मी अल्पसंख्यांक असल्यामुळे टार्गेट करीत आहेत, असे विधान कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्य वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी महिनाभरापूर्वी केलं होते. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिला आहे.

मुश्रीफांना टारगेट करण्याचा प्रश्न नाही, तर आम्हाला आमचा उमेदवार त्या मतदारसंघात निवडून आणायचा आहे. त्यामुळे जागा बिनविरोध सोडायला पाहिजे, अशी कोणाची अपेक्षा असेल तर ती अवघड असल्याचा टोला पाटील यांनी लगावला.

ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक करायचे होते. ती जागा मीच शोधून काढली आहे. मी त्या कमिटीचा अध्यक्ष होतो. त्या जागेवर देशाचे पंतप्रधान यांनी जलपूजन आणि जागा पूजन केले आहे. पण अद्याप काही झाले नाही. पूर्वी शिवस्मारकाचे केलेलं डिझाईन बदलण्यात आले, त्यापूर्वी केलेले डिझाईन अतिशय उत्तम आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य केले होते, पण ते डिझाईन बदलून सरदार पटेल यांच्या पेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम त्या सरकारने केलं , आता आमचं सरकार आल्यावर आम्ही त्यात लक्ष घालू , स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती यांच्या आंदोलनावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Jayant Patil
Eknath Shinde: वाचाळवीरांची पाठराखण अन् CM शिंदेंची प्रतिमा जपण्याची कसरत!

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे संपलेली आहे.गुंडांच्या हातात राज्यकर्त्यांनी सर्व अधिकार दिलेत असं वाटतंय. सामान्य, माणसं, मुली, महिला घाबरलेल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात हे गृह खाते गंभीर नाही. मुख्यमंत्री देखील गंभीर नसल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यावरून बोलताना जयंत पाटील यांनी त्यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. हरियाणा जम्मू-काश्मीरमध्ये काय होणार हे एक्झिट पोल मध्ये कळलं आहे. केंद्र सरकार आणि भाजपची साथ महाराष्ट्रातल्या जनतेने सोडलेली आहे. हे मागच्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे. महाराष्ट्र त्यांच्या हातातून जाणार आहे, त्यामुळे ते शेवटचा प्रयत्न करत आहेत. ते येण्याबद्दल माझे कोणतेही ऑब्जेक्शन नाही पण ते जेवढे जास्त येतील तेवढ्या आमच्या जागा वाढतील असे विश्वास आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com