BJP Sarkarnama
पुणे

Pune BJP: पुण्यातील भाजप इच्छुकांनी वाजवला 'एम पी पॅटर्न' चा बँड; नेमकं काय घडलं?

Sudesh Mitkar

Pune Political News: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपने पदाधिकाऱ्यांच्या मतदानाची प्रक्रिया पार पाडली.

मध्यप्रदेश मध्ये झालेल्या मागील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अशाच प्रकारे उमेदवार निवडण्यासाठी प्रक्रियेचा अवलंब भाजपने केला होता. ही प्रक्रिया महाराष्ट्रातील देखील राबवण्याच्या प्रयत्न भाजपा ने केला मात्र या प्रक्रियेची बँड वाजवण्याचं काम भाजपचा इच्छुकांनी केल्या असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

भाजपाकडून पुण्यातील पर्वती, शिवाजीनगर, खडकवासला,पर्वती, कोथरूड आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार निवडण्यासाठी मंगळवारी पदाधिकाऱ्यांची मतदान प्रक्रिया झाली.

या प्रक्रियेमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं. यामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपलं सोडून इतर तीन प्रबळ उमेदवारांची नावे द्यायची होती. अशाच प्रकारचा पॅटर्न मागील निवडणुकीमध्ये मध्यप्रदेश मध्ये राबविण्यात आला होता आणि या पॅटर्नमुळे भाजपला योग्य उमेदवार निवडण्यासाठी मदत झाली.

त्याचा परिणाम निवडणुकीत देखील दिसून आला एम पी मध्ये भाजपाला चांगले यश मिळालं. त्यामुळे भाजपने हाच पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं निश्चित केला आहे. महाराष्ट्रात मंगळवारी ही प्रक्रिया पार पडली.

या प्रक्रिये दरम्यान पुण्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. विद्यमान आमदारांनी आपलीच नावे पुढे जावीत या दृष्टिकोनातून फिल्डिंग लावत इतर इच्छुकांची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र पाहायला मिळालं. मतदान प्रक्रियेत कोणा कोणाला मतदान करण्याचा अधिकार आहे.

याबाबतच्या याद्या इच्छुक उमेदवारांपासून लपून ठेवण्यात आल्या. त्यामुळे अनेकांना या मतदान प्रक्रियेची बाबत आणि बैठकीबाबत कोणतीही माहिती नसल्याचं समोर आलं. शिवाजीनगर सारख्या मतदारसंघांमध्ये अचानक मतदार यांची संख्या वाढवण्यात आली. यातून ठरवून इच्छुकांचा 'गेम' झाला असल्याची भावना काहींनी बोलून दाखवली.

निरीक्षकांना पसंतीक्रम देताना केवळ आमदारांचे नाव द्यायचे अन्य प्रमुख इच्छुकाचे नाव द्यायचे नाही, असे खास निरोप देण्यात आले. बैठकीमध्ये कोणता पदाधिकारी कोणाचे नावे सुचवत आहे. याचीही यंत्रणा कार्यरत होती.

इच्छुकांची नावे कार्यकर्त्यांना सांगू दिली जात नसल्याने एका इच्छुकाने खडकवासला मतदारसंघाच्या बैठकीत वाद घातला. तर पर्वती मतदारसंघात पक्षाच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना निरोप देण्यात आला नाही. याबद्दल कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली काहींनी पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केली आहे.

"या प्रक्रियेवरून नाव निश्चित झालं म्हणजे तेच त्यालाच उमेदवारी मिळेल असं काही नाही. काही लोकांना निरोप मिळाला नाही याबाबत तक्रारी आले आहे. योग्य ती कारवाई करण्यात येईल," असे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले.

काय घडले मतदारसंघात

  1. कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांचे नाव एकतर्फी चालले. अमोल बालवडकर, शाम देशपांडे यांच्या नावाला मोजक्यांनी पसंती दिली.

  2. शिवाजीनगरमध्ये अचानक पदाधिकारी वाढले, १७० जणांनी मतदान केले. शिरोळेंसोबत संदीप काळे, मधुकर मुसळे, बाळासाहेब अमराळे यांची नावे समोर आली. शिरोळे यांना सर्वाधिक पसंती.

  3. पर्वतीत माधुरी मिसाळ यांच्या यंत्रणेकडून मिसाळ यांच्या जवळच्या लोकांना निरोप, काही जणांना तुम्ही अपेक्षित नाही असे सांगून परत पाठवले. श्रीनाथ भिमाले, राजेंद्र शिळीमकर यांच्याही नावाला पसंती.

  4. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये बहुतांश सर्वच पदाधिकारी सुनील कांबळे, दिलीप कांबळेंच्या बाजूने, भरत वैरागे नावावर खूप कमी पसंती

  5. खडकवासल्यात भीमराव तापकीर यांच्यासाठी कार्यकर्त्यांवर दबाव. पसंतीक्रम द्यायला आमदारांचेच कार्यकर्ते. प्रसन्न जगताप, दीपक नागपूरे, दिलीप वेडे पाटील यांची नावे स्पर्धेत येऊ दिली नाही, निरोपही तसेच होते.

  6. कसब्यात हेमंत रासने, धीरज घाटे, कुणाल टिळक नावाला पसंती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT