Yashwant Co-operative Sugar Factory Sarkarnama
पुणे

Yashwant Sugar Factory: विधानसभेत भाजपच्या 5 आमदारांकडून 'यशवंत'च्या जमिनी विक्रीबाबत प्रश्न उपस्थित; सहकारमंत्र्यांची नाराजी

Yashwant Sugar Factory sparks row in Maharashtra’s Monsoon Session 2025: बचाव कृती समितीने सादर केलेल्या तक्रारीनुसार कारखान्यातील कारभार पारदर्शक नसल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

सुवर्णा कांचन

उरुळी कांचन (पुणे) : पुणे जिल्ह्यातील यशवंत सहकारी साखर कारखान्याचा जमिनी विक्रीचा प्रश्न सध्या राज्यभर गाजत आहे. त्याचे पडसाद आता विधानसभेपर्यंत उमटले आहेत. भाजपच्या पाच आमदारांनी या प्रश्नावर पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला.

यशवंत कारखान्याच्या जमीन विक्रीबाबतचा तारांकित प्रश्न आमदार उमा खापरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, अॅड. निरंजन डावखरे आणि डॉ. परिणय फुके यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी कारखान्यासंदर्भातील माहिती दिली. कारखान्याच्या जमिनींची तोट्यात विक्री करण्यासंदर्भात कारखान्याच्या संचालक मंडळ, कर्मचारी आणि सभासदांनी नाराजी व्यक्त केल्याचे बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

कारखान्याची प्रस्तावित शंभर एकर जमीन हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती यांना विक्री करण्याच्या संचालक मंडळाच्या निर्णयाच्या विरोधात बचाव कृती समितीच्या वतीने विकास लवांडे, लोकेश कानकाटे, सागर गोटे, राजेंद्र चौधरी, अलंकार कांचन या सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेत संबंधितांना नोटिसा पाठविल्या आहेत.

बचाव कृती समितीने सादर केलेल्या तक्रारीनुसार कारखान्यातील कारभार पारदर्शक नसल्याचे आरोप करण्यात आले आहेत. विकास लवांडे आणि अन्य तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये 'यशवंत'च्या जमीन विक्री व्यवहारास स्थगिती मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या सुनावणीत बचाव कृती समितीतर्फे अॅड. माधव सोमण यांनी वकिलीपत्र सादर करत आपली बाजू मांडली. कारखाना व्यवस्थापनातर्फे अॅड. शिवकुमार हंडाळे यांनी सुनावणीस हजेरी लावत, आपले लेखी म्हणणे सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितली आहे. जमीन विक्री संदर्भात दाखल तक्रारीवर प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग यांनी गंभीर दखल घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT