Ravindra Chavan BJP Maharashtra New Appointments Sarkarnama
पुणे

Maharashtra BJP Reshuffle: भाजपनं भाकरी फिरवली! महाराष्ट्रात नवीन जबाबदाऱ्या निश्चित; राजेश पांडे, निरंजन डावखरे...

BJP Maharashtra New Appointments: येत्या काळात पक्षाचे समन्वय आणि विविध कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

Mangesh Mahale

Maharashtra BJP News: महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेत राज्यभरात समन्वयक, संयोजक आणि सहसंयोजक यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. काल (5 मे ) हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

येत्या काळात पक्षाचे समन्वय आणि विविध कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी याबाबतचे पत्र प्रसिद्ध केले आहे.

या नियुक्त्यांमध्ये मुंबई, ठाणे-कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा सहा विभागांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक विभागासाठी समन्वयक, संयोजक आणि सहसंयोजक नेमण्यात आले असून संघटन विस्तार आणि पक्ष बळकटीकरणावर विशेष भर देण्यात येणार आहे.

मुंबई विभागासाठी राजेश पांडे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे-कोकण विभागात योगेश सागर यांच्यावर समन्वयकाची जबाबदारी सोपवण्यात आली असून प्रमोद जठार संयोजक तर संजय वाघुळे सहसंयोजक असतील.

पश्चिम महाराष्ट्रात निरंजन डावखरे यांच्याकडे समन्वयकपद, तर विक्रम पावसकर संयोजक आणि विक्रम देशमुख सहसंयोजक म्हणून काम पाहतील. उत्तर महाराष्ट्र विभागासाठी माधवी नाईक यांची समन्वयक म्हणून नियुक्ती झाली असून विजय चौधरी संयोजक आणि मंगेश चव्हाण सहसंयोजक असतील.

मराठवाडा विभागात सुनील राणे समन्वयक, नितीन काळे संयोजक आणि राहुल लोणीकर सहसंयोजक असतील. तर विदर्भ विभागात संजय कुटे यांच्याकडे समन्वयकपद, दिनेश सूर्यवंशी संयोजक आणि प्रविण दटके सहसंयोजक म्हणून जबाबदारी पार पाडतील.

ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटन मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. पक्षाच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने या निर्णयाला महत्त्व दिले असून कार्यकर्त्यांमध्येही यामुळे उत्साहाचे वातावरण आहे.

SCROLL FOR NEXT