Maharashtra Budget Session : Sanjay Raut Sarkarnama
पुणे

Sanjay Raut Statement : "विधीमंडळ नाही, चोरमंडळ.." ; राऊतांची घणाघाती टीका

Maharashtra Budget Session : राऊतांवर हक्कभंग दाखल होणार...

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics: ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांचं संसदेतील गटनेतेपद काढून घेण्याच्या हालचाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने सुरू करण्यात आले आहेत. शिंदेंच्या या राजकीय डावपेचावर राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, "त्यांची शिवसेना बनावट आहे. ते ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे. हे विधीमंडळ नाही. हे चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून जरी काढलं, तरी आम्ही पक्ष सोडणार असं होत का ? आम्हाला पदं बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दिली आहेत. आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीत. पदे गेली पदं परत येतील. आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत सद्या कोल्हापूरच्या दौऱ्यामध्ये आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात सर्वच भागात शिवसेना आहे. शिवसेनेचे नेते आहेत, उपनेते आहेत, प्रमुख अधिकारी संपर्क करत आहेत. जमिनीवरची मूळ शिवसेना पक्ष आमच्याचसोबत आहे. विधीमंडळातील पक्ष म्हणजे शिवसेना नाही, हे काल न्यायालयानेच सांगितंलं आहे, असे संजय राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT