College Employees Protest Sarkarnama
पुणे

Pune Education: ऐनदिवाळीतच फडणवीस सरकारला घेरणारं आंदोलन टळलं; पुण्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन तूर्तास स्थगित

Maharashtra Education News: महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यात मोर्चा काढला. उच्च शिक्षण संचालकांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीच्या आश्वासनानंतर कृती समितीने आंदोलन तूर्त स्थगित केले.

Sampat Devgire

Maharashtra Education News: परीक्षा असो वा सणासुदीचे दिवस दीर्घकाळ रेंगाळलेल्या प्रश्नांसाठी सरकारला जाणीव करून देण्यासाठी मोर्चे आणि आंदोलने हमखास होतात. राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ही संधी साधली होती. प्रलंबित मागण्यांसाठी ऐन दिवाळीत राज्य सरकारविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले होते. पुण्यातील उच्च शिक्षण विभागाच्या संचालक कार्यालयावर राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली.

त्यामुळे शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्य सरकारची सणासुदीच्या काळात कोंडी झाली होती. मात्र, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिवाळीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कृती समितीने तूर्त आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून पुण्याच्या संचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते उच्च शिक्षण विभागाच्या संचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढला. त्यावर दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन शिक्षण संचालकांनी दिले.

यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनी दिवाळीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर कृती समितीने तूर्त आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मोर्चादरम्यान कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी संचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चा अडवला. त्यानंतर कृती समितीच्या निवडक पदाधिकाऱ्यांना संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्यासोबत चर्चेसाठी बोलावण्यात आले. शिष्टमंडळाची चर्चा सुरू असतानाही बाहेर उपस्थित कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी सुरू ठेवली.

अखेर संचालक डॉ. देवळाणकर यांनी बाहेर येत मोर्चाला संबोधित केले. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सोबत झालेल्या चर्चेची माहिती देऊन आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. कृती समितीचे अजय बळवंत देशमुख, रावसाहेब त्रिभुवन, प्रकाश म्हसे, मिलिंद भोसले, दिनेश दखणे, उमेश देशमुख यांसह राज्यभरातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सातव्या वेतन आयोगानुसार सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करावी, जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह प्रदीर्घकाळ रंगाळल्या मागण्यासाठी हे आंदोलन होते. शिक्षण संचालकांनी दिलेला आश्वासनाने तुर्त शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि शासनाला दिलासा मिळाला आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT