Pune Political News : पुणे महापालिकेत नव्याने 34 गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्या गावांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीत सरकारमधील भाजप आणि शिवसेनेचाच (शिंदे गट) वरचष्मा होता. परिणामी ऐन लोकसभेच्या तोंडावर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) नाराजी पसरली होती. निवडणुकीत याचा फटका बसण्याची शक्यता होती. त्यामुळे या समितीत अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांना सामावून घेण्यात आले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शनिवारी लोकसभेची निवडणूक जाहीर केली आहे. दरम्यान, पुणे महापालिकेत 34 गावे नव्याने समाविष्ट केली आहेत. ही गावे बारामती आणि शिरूर मतदारसंघांवर प्रभाव टाकणारी आहेत. या गावांत विकासकामे करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची समिती स्थापन केली. त्यातून मात्र सत्तेतील अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांना सुरुवातीस डावलण्यात आले होते. या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाची ताकद आहे. त्यामुळे आता या समितीत राष्ट्रवादीच्या नऊ सदस्यांना समावून घेण्यात आले आहे.
या समितीत सुरुवातीला 12 सदस्य होते, त्यात वाढ करून ही संख्या 18 करण्यात आली होती. समितीत मात्र सत्ताधारी शिवसेना आणि भाजपलाच स्थान दिल्याचे स्पष्ट दिसत होते. परिणामी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. बारामती (Baramati) आणि शिरूरमधील ताकद लक्षात घेता लोकसभेला या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता होती. त्यातूनच राज्य सरकारने नव्याने आदेश काढत राष्ट्रावदीच्या नऊ जणांना या समितीत स्थान दिल्याची माहिती आहे.
यांची लागली वर्णी
समाविष्ट गावांच्या विकासासाठी स्थापन केलेल्या समितीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी आदेश काढले आहेत. यात पांडुरंग खेसे (लोहगाव वाघोली), बाबूराव चांदेरे (सूस म्हाळुंगे, बावधन), दत्ता धनकवडे (नऱ्हे-शिवणे, उत्तमनगर), राकेश कामठे (उंड्री पिसोळी, वडाचीवाडी), भगवान भाडळे (मंतरवाडी देवाची उरुळी), शांताराम कटके (कटकेवाडी वाघोली), गणेश ढोरे (ढोरेवस्ती, फुरसुंगी, भेकराईनगर) , राहुल पोकळे (धायरी), अजित घुले (मांजरी बु.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.