Maharashtra Gram Panchayat Election news update sarkarnama
पुणे

Gram Panchayat Election: मोठी बातमी : इच्छुकांनी रात्र जागवून काढली..; निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद

Gram Panchayat Election: औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक इच्छुकांची बुधवारी चांगलीच धावपळ झाली. राज्यभरात हा गोंधळ उडाला असल्याचे समजते.

सरकारनामा ब्युरो

Gram Panchayat Election: राज्यातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. (Maharashtra Political News) निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकांचे वारे सुरु झाले आहेत. (Maharashtra Gram Panchayat Election news update)

उद्या (शुक्रवारी) अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. पण निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद पडल्याने कालपासून (बुधवारी) अनेक इच्छुकांची धावपळ सुरु आहे. मुदतीच्या आत अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची मोठी कसोटी लागत आहे. निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद झाल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक इच्छुकांची बुधवारी चांगलीच धावपळ झाली. राज्यभरात हा गोंधळ उडाला असल्याचे समजते.

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या (शुक्रवार) शेवटची तारीख आहे. त्यासाठी अनेक इ्च्छुकांनी यासाठी बुधवारची रात्र जागवून काढली. अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन केंद्रात रात्र जागून काढत आहे.उमेदवारांना दोन दोन दिवस अर्ज भरण्यासाठी लागत आहे.

तारीख वाढवून द्यावी, अशी मागणी काहींनी केली आहे. तर आँनलाईन आणि आँफलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी पद्धत पुन्हा सुरु करावी, अशी मागणी या निमित्ताने पुन्हा जोर धरु लागली आहे.

राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 7751 गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी असणार आहे. 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 20 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगानं जारी केलेल्या आदेशानुसार 18 नोव्हेंबरला निवडणुकीची नोटीस जारी होईल. त्यामुळे निकाल जाहीर होईपर्यंत 7751 गावांमध्ये आचारसंहिता लागू असेल. त्यामुळे मोठी घोषणा, राजकीय लाभ मिळेल, अशी घोषणा खासदार, आमदार, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही. असे कोणी केले तर आचारसंहितेचं उल्लंघन ठरणार आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम

अर्ज दाखल करण्याची मुदत : 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर

अर्ज छाननी : 5 डिसेंबर

अर्ज मागं घेण्याचा दिनांक : 7 डिसेंबर

निवडणूक चिन्ह वाटप : 7 डिसेंबर दुपारी 3 नंतर

मतदानाची तारीख : 18 डिसेंबर

मतमोजणी आणि निकाल : 20 डिसेंबर

निकालाची अधिसूचना : 23 डिसेंबर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT