Gram Panchayat Elections : निवडणुका आल्या की चांदीच्या वस्तू, साड्या, किराणा आदींचे वाटप सुरु होते. काही उमेदवार पैशांचा धुराळा उडवतात. अशा उमेदवारांचा निवडणूक खर्च कोटींच्या घरात जातो, निवडणूका जाहीर झाल्यापासून उमेदवारांकडून मिष्टान्न व मासहार जेवणाच्या पंगती रोज उठवल्या जातात. या खर्चांवर निवडणूक आयोगाची नजर आहे. (Gram Panchayat Elections latest news)
ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला असून निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. प्रचाराच्या रणधुमाळीमुळे ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच निवडणूक आयोगाने सदस्य संख्येनुसार खर्च मर्यादा निश्चित केली असून ती जास्तीत जास्त 1.75 लाख इतकी असणार आहे.
यावेळी राज्य निवडणूक आयोगाने थेट सरपंच व सदस्य पदांसाठी निवडणूक खर्चची मर्यादा निश्चीत केली आहे. सदस्य पदासाठी ही मर्यादा पूर्वी 25 हजार होती. त्यामध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे. निवडणूक कार्यालयाच्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज भरण्यापासून उमेदवाराचा खर्च गृहित धरण्यात येतो. हा खर्च पावत्यांसह उमेदवारांनी संबंधित तालुक्यात प्राधिकृत करण्यात आलेल्या अधिकाऱ्याकडे नियमितपणे सादर करणे आवश्यक आहे.
राज्यातील थंडी वाढत असताना ग्रामपंचायत निवडणूकांमुळे ग्रामीण भागात मात्र वातावरण तापले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व सरपंच सर्व प्रभागांकरीता सामायिक राहणार आहे. प्रत्येक प्रभागात दोन्ही पदांकरीता सामायिक मतदान होणार आहे. त्यामुळे सरपंच पदाच्या उमेदवारांना सर्व प्रभागातील मतदारांशी संपर्क करावा लागणार आहे. त्यामुळे सदस्य पदाच्या तुलनेत सरपंच पदाच्या उमेदवाराचा निवडणूक खर्च जास्त राहणार आहे.
निवडणूक निकाल जाहीर होण्याच्या दिनांकापर्यंत हा खर्च सादर करावा लागतो. विहित मुदतीत खर्च सादर न केल्यास तसेच मर्यादेपेक्षा अधिक खर्च केल्यास उमेदवारावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. थेट सरपंचपदासाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने नेत्यांची चिंता वाढली आहे. त्यातच आता निवडणूक खर्चाच्या मर्यादेची भर पडल्याने सुयोग्य उमेदवार देण्यासाठी नेत्यांचा कस लागणार आहे.
थेट सरपंच, खर्च मर्यादा (रुपयात)
7 व 9 ः 50,000
11 व 13 ः 1,00,000
15 व 17 ः 1,75,000
सदस्य संख्या व खर्च मर्यादा (रुपयात)
7 व 9 ः 25,000
11 व 13 ः 35,000
15 व 17 ः 50,000
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.