Pune News: पुण्यात बोगस मतदान (Pune Lok Sabha Election 2024) होत असल्याचे काही ठिकाणी निष्पन्न झाले आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावाने बोगस मतदान झाल्याची माहिती समोर आल्यानंतर कोथरुडमध्ये एका नवमतदाराच्या नावाने बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गौतमी पवार हि पहिल्यादांच मतदारकेंद्रात मतदानासाठी आली होती, मतदान करण्यापूर्वी तिला आपल्या नावाने कुणीतरी मतदान केल्याचे तिच्या लक्षात आल्यावर तिने संताप व्यक्त केला. गौतमीनं निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोथरूड येथील थोरात उद्यानातील मतदान केंद्रात हा प्रकार घडला.
गौतमी म्हणाली की माझ्या नावाने कुणीतरी बोगस मतदान केले आहे. त्याचा मला प्रचंड राग आला आहे. मी एवढ्या उत्साहाने मतदान केंद्रात आले. मी पहिल्यादांच मतदान करण्यासाठी आले होते. पण माझ्या नावाने दुसऱ्यानेच मतदान केले असल्याचे माझ्या लक्षात आले,"
"हे असे कसे होऊ शकते," असा जाब तिनं निवडणूक अधिकाऱ्याला विचारला. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी तिनं केली आहे.
या प्रकारानंतर तिला अधिकाऱ्यांनी फॉर्म नंबर 17 भरून मतदान करा असे सांगितले. त्यानंतर गौतमीने मतदान केले. पण अशा पद्धतीने बोगस मतदान कसे झाले याचा विचार प्रशासन करणार आहे की नाही. हे पूर्णपणे चुकीचे आहे, असा प्रश्न उपस्थित करीत अधिकाऱ्यांच्या कारभारावर गौतमीनं प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावावरही बोगस मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सेंट मीराज् स्कूलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या नावावर आधीच मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिंदे यांच्या नावावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मतदान करून गेल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर शिंदे यांना टेंडर व्होट अंतर्गत मतदान करण्याची संधी देण्यात आली. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान उठवणारे आणि प्रचार करणारे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांचेही नाव मतदारयादीतून गायब झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.